पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये(Shivshahi bus) घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा एकदा सांगलीमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

ही घटना पुणे ते सांगली मार्गावर प्रवास करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीसोबत घडली. संशयित वैभव वसंत कांबळे याने बसमध्ये(Shivshahi bus) तरुणीसमोर अश्लील कृत्य करत विनयभंग केला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सांगली बस स्थानकावर ही घटना उघडकीस आली. पीडित तरुणीने प्रसंगावधान राखत बस चालक व तेथील पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयिताला पाठलाग करून अटक केली.
पीडित तरुणी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील रहिवासी असून, ती पुण्यात नोकरीसाठी राहते. ती स्वारगेट येथून सांगलीकडे जात असताना इस्लामपूर येथे संशयित बसमध्ये चढला आणि तिच्या मागील सीटवर बसला. आष्ठा येथे आल्यानंतर त्याने वारंवार खिडकीजवळून पीडितेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील वर्तन केले. रात्रीची वेळ असल्याने तरुणी घाबरली, मात्र बस सांगली स्थानकात पोहोचताच तिने आरडाओरड करत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याला चोप देत पोलीस ठाण्यात नेले.
या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांची सुरक्षितता कशी वाढवता येईल, याबाबत प्रशासनाला कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, आरोपीवर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
IPL 2025 आधी SRH ला मोठा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर
वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट
शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांसाठी ५-५ हजार कोटी निधी देऊन विकास साधावा – आमदार सतेज पाटील