महायुती(latest political news) आणि म.वि.आ.नंतर महाराष्ट्रात तिसरी आघाडी, हे दोन दिग्गज आले संभाजी राजेंसोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी तयार झाली आहे. यामध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी तसेच अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात महायुती(latest political news) आणि महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून ‘परिवर्तन महाशक्ती’ची घोषणा करण्यात आली आहे. कारण या स्टेत्ताधारी आणि विरोधी या आघाड्यांमुळे महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ असून त्यांना बदल हवा आहे असे मत माजी राज्यसभा खासदार संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे.
नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (ठाकरे गट), शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा समावेश आहे, तर सत्ताधारी आघाडीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. मात्र अशातच आता राज्याच्या राजकारणात तिसऱ्या आघाडीचा समावेश झाला आहे.
यासंदर्भात संभाजीराजे म्हणाले की, दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेनेच्या उपस्थितीने लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. दोन गट सत्तेत तर दोन विरोधात आहेत. म्हणूनच आपण परिवर्तनाची महासत्ता निर्माण केली आहे. याप्रकरणी 26 सप्टेंबर रोजी पहिली जाहीर सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याशिवाय जून 2022 आणि जुलै 2023 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. मराठा कोट्यातील कार्यकर्ते मनोज जरांगे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही नव्या आघाडीत सहभागी व्हावे, असे ते म्हणाले आहेत.
हेही वाचा:
एक देश, एक निवडणूक! शक्य आहे की अशक्य?
ठाकरे की शिंदे?, यंदा शिवाजी पार्कवर कोण गाजवणार दसरा मेळावा?
पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली अन्…