चिमुकल्या खेकड्याने केली भल्यामोठ्या गरुडाची शिकार, नांग्यानी चोचीला पकडले अन्… लढतीचा Video Viral

सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे आणखीन एक आश्चर्यकारक व्हिडिओ(video) व्हायरल झाला आहे, ज्यात गरुड आणि खेकड्यामधील मजेदार लढत दिसून आली. आता मुळातच गरुड हा एक धोकादायक प्राणी आहे. त्याला अवकाशातील राक्षस असेही म्हटले जाते. त्याच्या थरारक शिकारी पुढे अनेक मोठमोठ्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. गरुडाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर आजवर व्हायरल झाले आहेत मात्र नुकताच एक अनोखा व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे ज्यात गरुडाला एका खेकड्याने हैराण केल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ(video) व्हायरल होत आहे, जो गरुड आणि खेकड्याशी संबंधित आहे. हे गरुड आणि खेकडा यांच्यातील संघर्षाचे चित्रण करते.गरुड बहुतेक वेळा आकाशातील सर्वात वेगवान शिकारी मानला जातो, जो त्याच्या तीव्र दृष्टी आणि सामर्थ्याने दुरून शिकार पकडतो. या व्हिडिओमध्ये समुद्रकिनारी गरुड आपल्या चोचीत एका खेकड्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र खेकडा अशा प्रकारे गरुडाला चापट मारतो की तोही आश्चर्यचकित होतो. व्हिडीओचा शेवट आता अनेकांना थक्क करत आहे.

तुमच्या लक्षात येईल की गरुडाने आपली चोच खेकडा पकडण्यासाठी वापरताच खेकड्याने लगेच पलटवार केला. या पलटवारामुळे गरुड घाबरला आणि त्याला लगेच परिस्थितीतून मार्ग काढावा लागला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गरुड आपल्या शिकारीसाठी पाण्यातील एका खडकावर उभा राहतो. यावेळी माशा पकडण्याच्या विचारात तो तेथील एका खेकड्याला आपल्या चोचीत पकडतो मात्र इथेच तो मोठी चूक करून बसतो.

खेकडा हा प्राणी जरी लहान वाटत असला तरी त्याच्या नांग्यांमध्ये इतका जोर असतो की तो क्षणार्धात समोरच्याला क्षणार्धात जखमी करण्याची ताकद ठेवतो. यातही असेच काहीसे घडले, गरुडाने खेकड्याला चोचीत पकडताच खेकडा त्याच्या चोचीला नांग्यांनी विळखा घालतो. यांनतर गरुड तडफडत पाण्यात पडतो. हे सर्व घडत असताना गरुडाला आपल्या पराभवाची जाणीव होते आणि आपला जीव वाचवत तो तेथून कसा बसा पळून जातो.

गरुड आणि खेकड्याच्या या लढतीचा व्हिडिओ @waowafrica नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या लढतीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरेरे, बिचारा पक्षी हे हास्यास्पद नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्रथमच गरुडाने गेम गमावला. मी खूप आनंदी आहे कारण आतापर्यंत सर्व व्हिडिओमध्ये गरुडाने गेम जिंकला आहे”.

हेही वाचा :

‘मी पाकिस्तानला चाललेय…तिथेच लग्न करणार’; राखी PM मोदींवर नाराज

पत्नीची हत्या केल्यानंतर तुकडे केले, नंतर प्रेशर कुकरमध्ये टाकून तीन दिवस….

सैफ अली खान एवढ्या लवकर बरा कसा झाला? भाजप नेत्यांना वेगळाच संशय