पुणे : येरवड्यातील आयटी पार्क परिसरातील एका प्रसिद्ध फायनान्स(finance) कंपनीत काम करणाऱ्या महिलेला शरीर सुखाची मागणी करत तिला शरीर सुखाला तयार न झाल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक म्हणजे, महिलेने कंपनीतील(finance) कमिटीकडे तक्रार केली होती. परंतु, कमिटीने हे प्रकरण दडवले. त्यामुळे पुन्हा आरोपी त्रास देण्यास सुरूवात केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात शुभम दुबे (वय ३४) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३२ वर्षीय पिडीतीने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम दुबे हा फायनान्स कंपनीत असोसिएट क्लस्टर मॅनेजर आहे. तर, पिडीत महिला या कंपनीत नोकरीस आहेत. ही कंपनी एक प्रसिद्ध फायनान्स क्षेत्रातील आहे. त्यांचे कार्यालय येरवड्यातील आयटी पार्क येथे आहे.
दरम्यान, पिडीत या कंपनीतील वॉशरूमला जात असताना शुभम पाठलाग करत असत. तर पाठलाग करून त्यांना वॉशरूमला एवढा वेळ लागतो का ? अशी विचारणा करत. वारंवार पाठलाग करत असत. त्यांना उघड-उघड शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. नकार दिल्यानंतर मानसिक त्रास देत होता.
या त्रासाला कंटाळून त्यांनी कंपनीच्या कमिटीकडे तक्रार देखील केली होती. परंतु, कंपनीने तक्रार दडवून ठेवली. त्यामुळे पुन्हा शुभमने त्यांना त्रास देण्यास सुरूवात केली. तसेच, शारिरीक संबंधाला नकार दिल्याने त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देखील दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
बेपत्ता अंगणवाडी सेविकेबद्दल मोठी अपडेट, नदीमध्ये जे सापडलं ते धक्कादायक!
जेव्हा आमिर खानला दिवसभर KISS करत होती ‘ही’ अभिनेत्री…