अवघ्या दीड वर्षाच्या बाळाचा ताबा आईकडे(woman) देण्याच्या न्यायालयाच्या आदेशा नंतर देखील त्यासाठी धडपडत असलेल्या महिलेचा तिचा माथेफिरू पतीनेच भर दुपारी भर रस्त्यात गळा चिरून खून केल्याची घटना शुक्रवारी मीरारोड येथे घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर माथेफिरू पतीला पोलिसांनी अटक केली आहे. मीरारोडच्या नया नगर मधील अस्मिता रिजन्सी मध्ये राहणाऱ्या नदीम अझीझ खान आणि पत्नी आमरीन खान हे कौटुंबिक वादामुळे वेगळे राहत होते.
परंतु नदीमने दिड वर्षाच्या बाळासह १२ वर्षाच्या मुलीचा(woman) ताबा स्वतः कडे ठेवला होता. आमरीन ही मुलांना घेण्यासाठी यायची तेव्हा तिला मुलांना भेटू न देणं आणि तिच्यासोबत भांडण करणं असे प्रकार सुरु होते. याबाबत अनेकदा आमरीनने पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल केली होती.
मुलांसाठी व्याकुळ असलेल्या आमरीन हिने २०२३ साली मुलांचा ताबा मिळावा म्हणून ठाणे न्यायालयात दाद मागितली होती. ऑगस्टमध्ये ठाणे न्यायालयाने दिड वर्षाच्या बाळाचा ताबा आई आमरीनकडे तर १२ वर्षाच्या मुलीचा ताबा वडील नदीमकडे ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर देखील नदीम मुलाचा ताबा देत नसल्याने आमरीन नया नगर पोलीस ठाण्यात मुलाच्या ताब्या साठी जात होती.
गुरुवारी मुलाच्या ताबा घेण्यासाठी दोन पोलीस कर्मचारी तिच्या सोबत दिले गेले होते. परंतु घरी मुलं नव्हती. नदीमची आई मुलांना घेऊन अजमेर येथे दर्शनासाठी गेली आहे असं त्यानी सांगितले. परंतु मुलं इकडेच असल्याचा संशय असल्याने शुक्रवारी आमरीन पुन्हा नया नगर पोलीस ठाण्यात गेली होती. परंतु पोलिसांनी तिला सहकार्य केले नाही.
बराच वेळ बसून ती मुलगी(woman) शाळेत आहे कि नाही? हे पाहण्यासाठी नया नगरच्या एन एच शाळेत जाण्यास निघाली. दुपारी पाऊणच्या सुमारास आमरीन अस्मिता अनिता कॉम्प्लेक्स येथील मशिदी समोरून रस्त्यावरून चालत होती. त्याचवेळी नदीम आला आणि त्याने तिच्यावर चाकूने वार करत तिचा गळा चिरला.
भरदुपारी वर्दळीच्या रस्त्यावर हे हत्याकांड घडल्याने एकच खळबळ माजली. यासगळ्यावर भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. सुरेश येवले यांनी पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. सुरेश येवले म्हणाले की, सीसीटीव्ही यंत्रणा लोकार्पणाचा कार्यक्रम असल्याने मी पोलीस ठाण्यात होतो. त्यावेळी आमरीन बसलेली होती. आपण मुलाचा ताबा मिळवण्यासाठी अनेक दिवसांपासून पोलीस ठाण्यात फेऱ्या मारत असल्याचे तिने सांगितलं.
पुढे नवले असंही म्हणाले की, मी तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु कार्यक्रम संपल्यानंतर ती दिसली नाही. त्यानंतर तिची हत्या झाल्याचे समजलं. गुन्हे असलेल्या, राजकारणी, बिल्डर आदींना लगेच पोलीस संरक्षण मिळते. परंतु एका आईला तिच्या तान्ह्या बाळाचा ताबा देण्यासाठी पोलीस किती असंवेदनशीलता व उदासीनता दाखवतात.
तिच्या संरक्षण साठी किती दुर्लक्ष करतात याचा आमरीन हिची हत्या हे ज्वलंत उदाहरण आहे. अशा तीव्र शब्दांत भाजपा कार्यकर्ते येवले यांनी पोलिसांवर हल्लाबोल केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांना माथेफिरु नदीम ताब्यात घेतलं आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा:
Jio नं लाँच केले दोन नवीन प्लॅन; Swiggy आणि Amazon ची मेंबरशिप मोफत
‘मुलीकडे 20 मिनिटे बघूनही काही होत नसेल तर…’ झाकीर नाईकचे पाकिस्तानमध्ये वादग्रस्त विधान
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय, पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस