नातेवाईकांना फोन करून तरुणाची ‘पंचगंगे’त उडी…

कोल्हापूर : आपण आत्महत्या करीत असल्याचे काही नातेवाईकांना(selfie ai) सांगून रामेश्वर बाबूराव थोलंबरे (वय २६, मूळ रा. शेगाव, बुलढाणा, सध्या रा. बालगोपाल तालीमनजीक) याने बुधवारी पंचगंगा नदीत उडी घेतली होती. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीनजीक पाण्यात मिळाला. बिंदू चौक सबजेल रोडवर किचेन विक्री करणाऱ्या रामेश्वरचा मोबाईल चोरीस गेल्याने तो दोन दिवस अस्वस्थ होता. त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याचे नातेवाईकांना सांगितले.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, रामेश्वर थोलंबरे हा मूळचा शेगाव येथील राहणारा(selfie ai) होता. कामानिमित्त तो कोल्हापुरात आला होता. लाकडी अक्षरांचे किचेन बनवून तो विकत होता. त्याच्याकडील किचेनला मागणी असल्याने त्याने पुणे, लोणावळा, सातारा अशा ठिकाणी त्याचा पुरवठा सुरू केला होता. तीन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्याने त्याने आईलाही कोल्हापुरात आणले होते.

रामेश्वरने आईचा मोबाईल घेऊन बुधवारी सायंकाळी पंचगंगा पूल गाठला. मामेभावासह काही मित्रांना त्याने पंचगंगा नदीत उडी मारत असल्याचे सांगितले. काही वेळातच त्याचे काही नातेवाईक पंचगंगा नदीजवळ पोहोचले. पण त्याने फोन केलेला नंबरही बंद होता.

यानंतर मित्रांनी त्याचा शोध घेतला असता, त्याची दुचाकी पंचगंगा स्मशानभूमीजवळ आढळली. याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबविली. मात्र गुरुवारी सकाळी रामेश्वरचा मृतदेह नदीपात्रामध्ये आढळला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

पंचगंगा नदीकाठावर पहाटेपासून रामेश्वरचे मित्र आले होते. सकाळी आठच्या सुमारास एक मृतदेह स्मशानभूमीसमोर पाण्यात तरंगताना मिळाला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हा मृतदेह पाण्याबाहेर काढला असता, तो रामेश्वरचाच असल्याने नातेवाईकांनी ओळखले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा :

इचलकरंजी पंचगंगा पूलावर भरधाव ट्रकची पलटी…

इचलकरंजीतील तरुण सेल्फी काढताना गेला वाहून….

‘फेक बेबी बंप’ म्हणून झालेल्या ट्रोलिंगनंतर दीपिका आली समोर; Video