जोतिबाचे दर्शन घेऊन आलेल्या तरुणाचा कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडून मृत्यू….

जोतिबाचे दर्शन घेऊन कोल्हापुरात आल्यानंतर पंचगंगा(oyo panchganga kolhapur) नदीत पोहताना सोलापूरच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सुमित सुभाष मोरे (वय २७, रा. जुळे सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. ५) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमित मोरे हा एका मित्रासोबत जोतिबाच्या दर्शनासाठी आला होता. दोघेही रविवारी सकाळी जोतिबा डोंगरावर पोहोचले. दर्शन घेऊन ते दुपारी कोल्हापुरात पंचगंगा(oyo panchganga kolhapur) नदी घाटावर आले. उन्हाचा तडाखा असल्यामुळे समित पोहण्यासाठी पाण्यात उतरला.

त्याला पोहता येत होते. दुसऱ्यांदा पोहण्यासाठी आत गेलेल्या सुमितला दम लागल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार लक्षात येताच नदीत पोहत असलेल्या काही तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.

बुडालेल्या सुमितला पाण्याबाहेर काढून त्याच्या पोटात गेलेले पाणी काढण्याची धडपड तरुणांनी केली. त्यानंतर बेशुद्धावस्थेत त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. डोळ्यासमोर सुमित बुडाल्याने सोबत आलेल्या मित्राला धक्का बसला. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

हेही वाचा :

महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस !

कोल्हापुरातील ‘या’ दोन उमेदवारांना आयोगाची नोटीस; निवडणुकीचा खर्च अमान्य

कार्यकर्त्याने खांद्यावर हात ठेवला.. उपमुख्यमंत्र्यांनी थेट कानाखाली लगावली Video