लग्नाहून घरी जाताना कारची तरुणीला जोरदार धडक; धडकी भरवणारी घटना Viral Video

यूपीच्या कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे एका लग्न समारंभातून परतणाऱ्या तरुणीला एका कार चालकाने धडक दिली. संपूर्ण घटना जवळील (viral video)सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एवेढच नाही तर या घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

व्हायरल (viral video)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुणी रस्त्याच्या एका कडेने घरी परतत असताना दिसत आहे. मात्र रात्रीची वेळ असल्याने त्या परिसरात नागरिकांची जास्त गर्दी नाही. काही वेळात तरुणी जात असताना तिच्या समोरुन जोरदार वेगात एक कार येते आणि कारची धडक तिला बसते. तरुणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फेकली जाते. या घटनेत तरुणीला किती लागले हे समजू शकलेले नाही मात्र संपूर्ण घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेली आहे

व्हायरल होत असलेली घटना एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ”@gharkekalesh” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच कॅप्शनमध्ये,”यूपीमध्ये एका लग्न समारंभातून परतणाऱ्या मुलीला एका कार चालकाने धडक दिली” लिहिले आहे. घडलेल्या घटनेवर सध्या सर्व माध्यमातून नेटकऱ्यांनी हैराणजनक आणि संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

हेही वाचा :

ईव्हीएम जबाबदार नाही? आता वाढीव मतांवर संशय; काँग्रेसचा नेत्यांवर ठपका!

क्वीन परतली! ऐश्वर्या रायचा खास फोटो व्हायरल…

इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत