गेल्या अनेक दिवसांपासून राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री २’ चित्रपटाची(song) जोरदार चर्चा सुरू आहे. ‘स्त्री’ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षकांना ‘स्त्री २’ची प्रचंड उत्सुकता आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.
पोस्टर, टीझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर(song) रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटातलं पहिलं गाणं आलं आहे. ‘आज की रात’ असं गाण्याचं नाव असून या गाण्यामध्ये प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना तमन्ना भाटिया दिसणार आहे.
२०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटामध्ये ‘कमरिया’ गाण्यावर नोरा फतेहीने डान्स केला होता. पण आता ‘स्त्री २’ चित्रपटामध्ये आयटम साँगमध्ये तमन्ना भाटिया दिसणार आहे. चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा चित्रपटातील आयटम साँगमध्ये, तमन्ना भाटिया दिसणार अशी चर्चा सुरू होती. पण खरंतर या चर्चेवरून आता पडदा हटलेला आहे. या आयटम साँगमध्ये तमन्ना भाटिया कहर करताना दिसत असून तिच्या कातिलाना अंदाजाचीही जोरदार चर्चा होत आहे.
‘स्त्री २’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी आहे. ‘स्त्री २’च्या ट्रेलरमध्ये चंदेल गावातली गोष्ट दाखवण्यात आली आहे. पुन्हा एकदा गावातल्या लोकांमध्ये ‘स्त्री’ परत आल्याची दहशत पाहायला मिळत आहे. खरंतर ‘स्त्री’ परत आल्यामुळे लोकांमध्ये, प्रचंड भीती आहे. ट्रेलरमध्ये, श्रद्धा पुन्हा एकदा स्त्रीच्या भूमिकेत दिसत असून चंदेल गावातल्या लोकांची ती रक्षा करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला चित्रपटाचं वेगळं कथानक पाहायला मिळेल.
‘स्त्री’मध्ये एका महिलेची आत्मा चंदेल गावातील पुरुषांचा सूड घेते, असे दाखवण्यात आले होते. त्यानंतर तिची अपूर्ण इच्छा पूर्ण करून तिला शांत केलं जातं. आता ‘स्त्री’च्या सीक्वेलमध्ये एक पुरुष आत्मा दाखवण्यात आला आहे. तो गावातल्या मुलींना संपवण्याचा प्रयत्न करतो, असं दाखवलंय. अखेर गावकरी एका गाव गुंडाची आणि त्याच्या गँगची मदत घेताना दिसतात. या ट्रेलरमधील संवादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. कॉमेडी- थ्रिलर चित्रपटाच्या काही दृश्यांनी तुमचीही नक्कीच घाबरगुंडी उडेल.
१५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये, राजकुमार आणि श्रद्धाचा ‘स्त्री २’, जॉन अब्राहमचा ‘वेदा’ आणि अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’ या चित्रपटाचा समावेश आहे. या तिनही चित्रपटामध्ये सर्वाधिक कमाई कोण करणार ? हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल.
हेही वाचा :
दिव्यांगांना दरमहा 1 ते 3 हजारांपर्यंतचे अर्थसहाय्य: ‘या’ ठिकाणी करा अर्ज
मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित: “सरकारची खुर्ची धोक्यात येईल” असे त्यांनी चेतावले
सरकारचा धक्कादायक निर्णय: 600 शाळांवर टाळे, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ