आज संकष्ट चतुर्थीचा पवित्र दिवस आहे. हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्व दिले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा (Puja)करण्याची आणि चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. या व्रताच्या विशेष महत्त्वामुळे आणि विविध योगांच्या संयोगामुळे आजचा दिवस भक्तांसाठी अधिक खास आहे.
संकष्ट चतुर्थी 2024: तिथी आणि शुभ मुहूर्त
संकष्ट चतुर्थीचे व्रत आज, 22 ऑगस्टला सुरू होईल आणि 23 ऑगस्टला समाप्त होईल. दुपारी 01:46 वाजता चतुर्थी तिथी सुरू होईल आणि सकाळी 10:38 वाजता व्रत संपेल.
चंद्रोदयाची वेळ
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रपूजनाचे विशेष महत्त्व आहे. चंद्राची पूजा करण्यासाठी चंद्रोदयाची वेळ विचारात घ्यावी लागते. विविध शहरांमधील चंद्रोदयाची वेळ खालीलप्रमाणे आहे:
- कोल्हापूर: 08:58 PM
- मुंबई: 09:02 PM
- पुणे: 08:58 PM
- सांगली: 08:56 PM
- ठाणे: 09:02 PM
- नागपूर: 08:36 PM
- सातारा: 08:58 PM
संकष्ट चतुर्थीची पूजा पद्धत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत पारंपरिक पद्धतीने करण्याचे महत्त्व आहे:
- सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करा.
- स्वच्छ कपडे घाला आणि गणेशाची पूजा विधीपूर्वक करा.
- गणेशाची मूर्ती फुलांनी सजवा, चंदनाचा टिळा लावा, फुले व पाणी अर्पण करा.
- मोदक अर्पण करा आणि अगरबत्ती पेटवा.
- गणेश मंत्रांचा जप करा आणि संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी पूजा करून संकष्ट चतुर्थी कथा वाचा.
- चंद्र पाहून उपवास संपवा.
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि पूजा विधी पद्धतपूर्वक पार पडल्यास गणेश बाप्पा इच्छापूर्तीसाठी आशीर्वाद देतील, असा विश्वास आहे.
हेही वाचा:
उर्वशी रौतेला रुग्णालयात दाखल; ‘प्रार्थना करा’ कॅप्शनने उडवले सोशल मीडियावर चर्चेचा धुमाकूळ
रोहित शर्माचे अभूतपूर्व विक्रम: दुसऱ्या जन्मातही मोडण्याची शक्यता कमी!
जान्हवीच्या माफीने ‘बिग बॉस’च्या घरात भावनिक क्षण, पंढरीनाथ कांबळेसमोर अश्रूंनी दिली कबुली