वीस वर्षांपूर्वी निधन झालेल्या ‘या’ अभिनेत्रीसारखी हुबेहूब दिसते आराध्या

सध्या सोशल मीडियाच्या विश्वात अनेक सेलिब्रिटींची एकमेकांशी(looks) तुलना होत असते. यात आता अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्याचाही समावेश झाला आहे. आराध्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात तिची तुलना एका दिवंगत अभिनेत्रीशी केली जात आहे. आराध्याने तिच्या शाळेत परफॉर्म केलं होतं.

तेव्हाचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल(looks) होत आहे. या फोटोंमध्ये आराध्या ही हुबेहूब दिवंगत अभिनेत्री सौंदर्यासारखीच दिसत असल्याचं म्हटलं जात आहे. तर एका विशिष्ट हेअरस्टाइलमधील आराध्या आणि सौंदर्या यांचे फोटो एकत्र एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्येही दोघींच्या दिसण्यात बरंच साम्य असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

अभिनेत्री सौंदर्याचं 17 एप्रिल 2004 रोजी एअरक्राफ्ट क्रॅशमध्ये निधन झालं होतं. सौंदर्या तिच्या दिसण्यामुळे आणि दमदार अभिनयकौशल्यामुळे प्रचंड लोकप्रिय होती. सौंदर्याची भूमिका असलेला ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट माहित नाही, असा भारतात एकही चित्रपट रसिक नसेल. हिरा ठाकूरच्या प्रेमात पडलेल्या राधाची भूमिका तिने साकारली होती. सौंदर्याच्या ‘सौंदर्य’, अदाकारी आणि अभिनयाच्या प्रेमात अनेक जण होते, किंबहुना आजही असतील.

भाजपमध्ये प्रवेश केलेली सौंदर्या ही भाजप आणि तेलुगू देसम पक्षाच्या प्रचारासाठी बेंगळुरूला जात होती. 100 फूट उंचीवर गेलेलं तिचं चार्टर्ड विमान खराब हवामानामुळे कोसळलं आणि पेटलं. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं की विमान कोसळल्यानंतर सौंदर्या धावत बाहेर आली होती. तेव्हा तिची साडी पेटली होती. ‘जीव वाचवा’ म्हणून ती गयावया करत होत्या, पण दुर्दैवाने तिला वेळीच मदत मिळू शकली नव्हती.

आराध्या ही सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेली स्टारकिड आहे. नुकतीच ती आई ऐश्वर्यासोबत ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला गेली होती. आईसोबतचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आराध्या ही धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतेय. या शाळेच्य वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात तिने अभिनय केला होता. यावेळी आराध्याचं प्रचंड कौतुक झालं होतं.

हेही वाचा :

7 तासांत 15 निष्पाप मुलांचा बळी; सरकारी यंत्रणा ठरतेय फेल…

एक शो दोन विजेते, ‘Dance Deewane 4’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं

भाजप पक्षामध्ये जावं असं काही सहकाऱ्यांचं म्हणणं….; शरद पवारांचा सर्वात मोठा खुलासा

अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी 25 ते 30 कोटी वाटले : संजय राऊत