कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लोकसभा, विधानसभा(political) निवडणुका जाहीर झाल्या की, एरव्ही कानावरून सुद्धा न गेलेल्या राजकीय पक्षांची नावे पुढे येतात. अरे, ह्या नावाचा राजकीय पक्ष महाराष्ट्रात आहे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य मतदाराला पडावा. होय! ही वस्तुस्थिती आहे, वास्तव आहे.
महाराष्ट्रात केंद्रीय निवडणूक(political) आयोगाकडे रीतसर नोंद असलेले तब्बल 145 राजकीय पक्ष महाराष्ट्रात आहेत आणि देशभर एकूण 2234 राजकीय पक्ष आहेत. महाराष्ट्रात एक दोन पक्षांनी आपले उपद्रव मूल्य सिद्ध केले आहे. त्यातून त्यांनी “छोटा पॉकेट बडा धमाका”अशी इतर प्रस्थापित पक्षांना त्यांनी आपली ओळख करून दिली आहे, किंवा देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला राजकीय सारीपाटाच्या गावात घ्या नाहीतर तुमचा डाव उधळून लावतो अशी अपेक्षा धमकी त्यांच्याकडून दिली जात आहे आणि असते.
राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पार्टी, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय मान्यता असलेले राजकीय पक्ष आणि शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन राज्यस्तरीय पक्ष महाराष्ट्रात आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, यांच्या नावाचे गट राजकारणात आहेत. अजितदादा यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे अधिकृत चिन्ह असले तरी त्यांचाही गट अशीच सध्याची त्यांची ओळख आहे. पण किमान हे पक्ष महाराष्ट्रातील शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणजे ते प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत. सध्या हे पक्ष महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये विभागले गेले आहेत. मनसे, वंचित आघाडी हे सुद्धा सामान्य मतदाराला माहीत असलेले पक्ष आहेत.
महाराष्ट्रात काही असे राजकीय पक्ष आहेत की ते मर्यादित क्षेत्रात ओळखले जातात. त्यांचा वावर सत्ताकारणातही असतो. महाराष्ट्रात अमुक विभागातील इतके, तमुक विभागात इतके उपद्रव मूल्य आहे, असे हे सातत्याने सांगत असतात. आमचा उमेदवार निवडून येणार नाही पण तुमचा उमेदवार आम्ही नक्की पाडू शकतो असे इशारे त्यांच्याकडून प्रस्थापितांना दिले जातात. काहींच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांचे राष्ट्रीय पक्ष लोकांच्या लक्षात राहतात. असे किंचित किंवा बऱ्यापैकी राजकीय उपद्रव्य मूल्य असलेल्या पक्षांकडे, प्रस्थापित पक्षांना दुर्लक्ष करून चालत नाही. प्रस्थापित नेत्यांना मग त्यांच्याशी मांडवली करावीच लागते. चर्चा करावीच लागते. काही जागा त्यांच्यासाठी सोडाव्या लागतात. पण तिथे त्यांचा उमेदवार निवडून येतोच असे नाही. याशिवाय मग तुमचं राजकीय पुनर्वसन करू असा शब्द या फुटकळ पक्षांना, द्यावा लागतो. बड्या नेत्यांकडे याशिवाय पर्याय नसतो.
सध्या महाराष्ट्रात विधानसभांच्या(political) निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दिनांक 20 ऑक्टोबर पासून निवडणूक प्रक्रिया सुरू सुद्धा झालेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्थापित पक्ष एकत्रित असलेल्या महाविकास आघाडी तसेच महायुती या दोन्ही ठिकाणी जागा वाटपांची सुरू झालेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोणत्या पक्षाला किती जागा हे आता जवळपास ठरलेले आहे. अशावेळी आपले उपद्रव मूल्य अधोरेखित करून प्रस्थापित पक्षांकडे काही छोट्या फुटकळ पक्षांकडून आम्हाला सुद्धा तुमच्या कोट्यातून जागा सोडा अशी मागणी केली जाऊ लागली आहे. धर्माचे कार्ड हातात घेऊन काहीजण अमुक टक्के आमच्यासाठी जागा सोडा असे बोलू लागले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदा घडत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर “दर महिन्याला काहीजण आपल्या राजकीय पक्षाची नोंदणी करत असतात, काही जणांचे नोंदणीकृत राजकीय पक्ष महिन्याभरात बंदही पडत असतात”अशी माहिती मिळते. इंग्लंड, अमेरिका वगैरे राष्ट्रांमध्ये द्विपक्षीय लोकशाही आहे. म्हणजे त्या देशात दोनच पक्ष आहेत. भारतात मात्र अनेक पक्षीय लोकशाही आहे. काही पक्ष राज्यात तिथल्या जनतेपुरते मर्यादित माहीत असतात. महाराष्ट्रात असे अनेक राजकीय पक्ष आहेत की त्यांची नावे सुद्धा लोकांच्या कानावरून गेलेली नाहीत. हे राजकीय पक्ष तात्कालीक फायद्यासाठी स्थापन झालेले असतात.
हेही वाचा:
‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरु करण्याचे अमित शाह यांचे षडयंत्र’; संजय राऊतांचा घणाघात
बाबा सिद्धीकीनंतर लॉरेन्स बिश्नोईचे पुढचे टार्गेट राहूल गांधी…; अभिनेत्याचे वादग्रस्त विधान
मजुरासोबत रस्त्यावर झोपला अभिनेता, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून ट्रोल