शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील विशाल विश्व सोसायटी समोर उभ्या असलेल्या युवकाला पत्ता विचारण्याचा बहाणा करुन कारमधून(car) त्याचे अपरहण करत मारहाण केली. त्याच्याजवळील मोबाईलही काढून घेतला, मात्र युवक कारच्या बाहेर पळाला. 3 आरोपींनी कारेगाव येथून पळ काढल्याची केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील अशरफ धोंडफोडे हा विशालविश्व सोसायटी समोर उभा असताना एका कारमधून(car) तिघेजण आले, अशरफला मुंबईला जायचा रस्ता कोठून आहे असे म्हणत त्याला ओढून कारमध्ये घेत पुणे नगर रस्त्याने घेऊन जात मारहाण करुन पैसे दे नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. नातेवाईकांकडून फोनवर पैसे मागवण्यास सांगितले.
दरम्यान तळेगाव ढमढेरे ते कारेगाव पर्यंत त्याला मारहाण करत घेऊन गेल्यानंतर कारमधील एकजण पाणी बॉटल घेण्यासाठी खाली उतरला असता अशरफ ओरडत कारच्या बाहेर पळाला दरम्यान तेथून जाणाऱ्या शिरुरच्या पोलिसांनी सदर प्रकार बघितल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याची विचारपूस करत पोलीस हवालदार तेजस रासकर यांनी अशरफ याच्या नातेवाईकांना माहिती देत त्याला शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये आणले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, प्रतिक जगताप यांनी तळेगाव ढमढेरे ते कारेगाव या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, याबाबत अशरफ अब्बास धोंडफोडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी तीन अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहेत.
हेही वाचा:
भारतीय क्रिकेट संघाचा चिंता ठरला हार्दिक पांड्या, व्हिडीओ पाहून तुम्ही पण व्हाल थक्क
नवरात्रोत्सवात होणार स्त्रीशक्तीचा जागर, अनुश्री फिल्म्स प्रस्तुत तीन लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक राज्य सरकारकडून रद्द