बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्या(viral) सतत चर्चेत असतात. या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. दरम्यान, घटस्फोटांच्या अफवांवर अभिषेक बच्चनने मौन सोडलं आहे. अलिकडेच एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने स्पष्ट केलं आहे की, घटस्फोटासंबंधित बातम्या अफवा असून तो अजूनही विवाहित आहे.
=एकीकडे अभिषेक बच्चनने घटस्फोटाच्या अफवांना (viral)पूर्णविराम दिला आहे. त्यानंतर ऐश्वर्या रायने या प्रकरणावर आतापर्यंत मौन का पाळलं आहे, असा प्रश्न काही चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, अभिषेक बच्चन याने पत्नी ऐश्वर्या रायचं करिअर उद्ध्वस्त केल्याचा दावा एक पोस्टमधून करण्यात आला असून ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रेडीट पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्हायरल पोस्ट पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, अभिनेता शाहरुख खानसोबतच्या ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आधी ऐश्वर्या रायला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. अभिषेक बच्चन याबाबती खूप असुरक्षित होता आणि ऐश्वर्याने शाहरुख खानसोबत चित्रपटात काम करावं अशी त्याची इच्छा नव्हती, असा दावा या पोस्टमधून करण्यात आला आहे.
तसेच, दोस्ताना चित्रपटासाठी अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या आधी ऐश्वर्या रायला ऑफर देण्यात आली होती, असा दावाही या सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, अभिषेक बच्चनने तिला दोस्ताना चित्रपटात काम करू दिलं नाही, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर ऐश्वर्या रायला अनेक मोठ्या चित्रपटांची ऑफर आली होती, जी तिने कोणत्या ना कोणत्या कारणाने नाकारली होती, असा दावाही या पोस्टमधून करण्यात येत आहे. दरम्यान, या व्हायरल दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा तत्थं नसलं तरी यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा :
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची संवाद यात्रा: २० ऑगस्टपासून कोल्हापूर येथून सुरुवात
स्वातंत्र्यदिनाचा उत्सव: आरोग्यदायी ज्यूस आणि ट्रेंडी सजावटीने साजरा करा!
लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता जमा; भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकले