शहरातील मुख्य रहदारीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती, कमी गरज असलेल्या भागात विनाकारण तैनातीवर नागरिक आक्रमक

इचलकरंजी: शहरातील वाहतूक नियंत्रणाच्या व्यवस्थेवर सध्या गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित(traffic) केले जात आहे. मुख्य रहदारीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती आणि कमी रहदारी असलेल्या भागांत विनाकारण पोलिसांची तैनाती यामुळे नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे.

जनता चौक, शाहू पुतळा, Asc कॉलेज, गांधी पुतळा(traffic), राजवाडा चौक, उत्तम चित्र मंदिर, थोरात चौक, सुंदर बाग, आणि डेक्कन चौक या शहरातील अतिरहदारीच्या ठिकाणी 1 ते 2 तारखेच्या दरम्यान एकही वाहतूक पोलीस तैनात नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले आहे. या भागांमध्ये रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची उपस्थिती अत्यावश्यक असते. मात्र, पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे वाहतुकीची शिस्त बिघडली असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

याउलट, कबनुर ओढा, काळा ओढा, कबनुर दर्गा, शहापूर मसोबा, यड्राव फाटा, शिरढोण टाकवडे ओढा, नदीचा पूल, आणि वखारभाग या ठिकाणी, जिथे विशेष वाहतूक नियंत्रणाची गरज नाही, तिथे दोन-दोन ट्रॅफिक पोलीस तैनात केले जात असल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी ट्रॅफिकची जास्तीची गरज नसतानाही, पोलिसांची उपस्थितीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांनी असा आरोप केला आहे की, अशा विनाकारण तैनातीमुळे अनावश्यक दंड आकारला जात आहे, ज्यामुळे सामान्य वाहनचालकांमध्ये रोष पसरला आहे.

वाहतूक पोलिसांच्या गैरहजेरीमुळे मुख्य रहदारीच्या ठिकाणी वाहनांची शिस्त बिघडली असून, वाहतुकीला शिस्त लावणार कोण, असा सवाल जागरूक नागरिकांनी उपस्थित केला आहे. काही जागरूक नागरिकांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे आणि नव्याने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी यावर तातडीने लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.

नागरिकांच्या मते, या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना न केल्यास शहरातील वाहतूक समस्या गंभीर होऊ शकते. या समस्येवर चर्चेच्या माध्यमातून उपाय शोधणे आणि योग्य ठिकाणी पोलीस तैनाती सुनिश्चित करणे आवश्यक आहे, जेणेकरून रहदारीला शिस्त लागेल आणि अपघात टाळता येतील.

हेही वाचा :

सर्वसामान्यांना दिलासा! टोमॅटोचे दर अर्ध्यावर, पण इतर भाज्या कडाडल्या

 HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ४ ऑगस्टला राहणार UPI सेवा बंद

महासत्ता चौकाजवळ पाण्याचा साठा आणि अपघातांचा सिलसिला: प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर जनता आक्रमक