बीडमध्ये अंबाजोगाई लातूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. एसटी बस(marriage ceremony) आणि दुचाकीच्या भीषण अपघात तिघांचा जागीत मृत्यू झाला आहे. लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाची असा तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. सेवालाल पंडित राठोड (वय 21 वर्ष), बहीण दिपाली सुनील जाधव (वय 20) आणि भाची त्रिशा सुनील जाधव (वय 1 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवालालचं महिनाभरानंतर लग्न(marriage ceremony) होतं. त्यासाठी सर्वजण लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते. तिथून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला एसटी बसने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात भावी नवरदेव तरुणासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला.
येत्या 28 एप्रिल रोजी सेवालालचा विवाह होणार होता. या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू होती. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल बीडच्या राडी तांडा येथे राहणाऱ्या बहीण दिपाली सुनील जाधव आणि एक वर्षाची भाची त्रिशा यांना घेऊन अंबाजोगाईला आला होता. लग्नाचा बस्ता बांधून बहीण आणि भाचीला घेऊन सेवालाल हा काल सायंकाळी दुचाकीवरून गावाकडे परत निघाला होता.
वाघाळा पाटीजवळ समोरून येणाऱ्या लातूर-छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अंबाजोगाई – लातूर महामार्गावरील बीडच्या वाघाळा पाटीजवळ हा अपघात झालाय. या भीषण अपघात तिघांचा जागीत मृत्यू झाला आहे.
भीषण अपघातात बसखाली दुचाकी फरफटत जाऊन सेवालाल, बहीण दिपाली आणि भाची त्रिशा यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी स्वाराती रुग्णालयात धाव घेतली होती. एकाच वेळी तिघांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा :
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड EX पत्नी बेस्ट फ्रेंड्स! एकमेकांना ‘या’ नावानं मारतात हाक
भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल