दहिसर येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

मुंबईच्या दहिसर परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. एमएचबी कॉलनी पोलिसांनी (police)ही कामगिरी केली आहे. आरोपी फरार होता आणि उत्तर प्रदेशात लपून बसला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतला आणि अखेर त्याला उत्तर प्रदेशातून जेरबंद केले. आरोपीला मुंबईत आणण्यात आले असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काही दिवसांपूर्वी दहिसरमध्ये घडली होती. एका 13 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला होता. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आणि आरोपी फरार असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आणि अखेर त्याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात यश आले.

हेही वाचा:

एटीएम फसवणुकीचा नवा प्रकार: मदतीच्या नावाखाली वृद्धांना लुटले

महाराष्ट्रातील विद्यार्थी सर्वाधिक चिंतेत, आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक

लातूर दहीहंडी दुर्घटना: 17 वर्षीय युवकाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा पसरली