पुण्यातीलस्वारगेट बसस्थानकावर तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना (claim)घडल्यानंतर मुख्य आरोपी दत्ता गाडे याला अखेर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र, अटकेनंतर पोलिसांसमोर दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. गाडेने बलात्काराच्या आरोपांचे खंडन करत संबंध सहमतीने झाले असल्याचा दावा केला आहे.

आरोपी दत्ता गाडेचा टाहो, पोलीस कोठडीत कबुली :
अटक झाल्यानंतर आरोपी दत्ता गाडे याला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान दत्ता गाडे पोलिसांसमोर हमसून रडल्याची माहिती मिळाली आहे.
“माझं चुकलंय, मी पापी आहे,” असं म्हणत त्याने पश्चात्ताप व्यक्त केला. मात्र, त्याने तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप फेटाळून लावत संबंध सहमतीने झाले होते, असा दावा केला (claim)आहे. यामुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दत्ता गाडेच्या या दाव्यामुळे पोलिसांपुढे नवा प्रश्न उभा राहिला आहे. पीडित तरुणी आणि आरोपी आधीपासून ओळखीचे होते का? तसेच, जर संबंध संमतीने झाले होते, तर पीडितेने जबाबात बलात्काराचा आरोप का केला? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून आरोपीच्या शोधात असलेल्या पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजता शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला अटक केली. दत्ता गाडेचा मोबाईल बंद अ (claim)सल्याने शोध मोहिमेत अडथळा येत होता. मात्र, अखेर पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतलं.
हेही वाचा :
‘महिलेच्या गालाला, शरिराला हात लावणं म्हणजे…’; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
भारतीय संघ अडचणीत, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा कर्णधार बदलणार?
राणीसारखं आयुष्य जगतेय प्रियांका चोप्रा; संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल