उचल घेतलेली रक्कम परत न केल्याने मुकादमाचा महिलेवर अत्याचार; ‘ते’ फोटो काढले अन्…

बीड : ऊस तोडणी करून पोट भरण्यासाठी ऊसतोड कामगार वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. अनेकदा काम करून देण्यासाठी काही रकमेची उचल करत कामावर त्याची फेड करत असतात. मात्र, उचल घेतलेली रक्कम परत देत नाही, या कारणावरून एका महिलेवर(woman) मुकादमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीडच्या दिंद्रुडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उसतोड कामगार कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जात असतात. ऊस तोडणीचे कंत्राट पद्धतीने काम घेऊन घेऊन मजुरांना त्याठिकाणी कामाला पाठविण्यात असते. मजूर महिलेने(woman) घेतलेल्या उचल रकमेतील काही रक्कम बाकी होती. ही बाकी रक्कम देत नाही, म्हणून एका विवाहित मजूर महिलेवर मुकादमाकडून अत्याचार करण्यात आला.

इतकेच नाही तर या महिलेचे अश्लील फोटो त्याने गावातील काही ग्रुपवर व्हायरल केले. हा प्रकार सहन न झाल्याने सदर महिलेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तिचा जीव वाचला आहे.

अमरावतीतही अत्याचाराची घटना नुकतीच घडली. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे लैंगिक शोषण केले आणि त्यानंतर तिला लग्नास नकार दिला. या घटनेची तक्रार पीडित तरुणीने मंगळवारी (दि. 8) राजापेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी सूरज संतोषराव बाहे (वय 32, रा. गोंडबाबा मंदिरामागे, अमरावती) याच्याविरुध्द गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. असे असताना आता उचल घेतलेली रक्कम परत न केल्याने मुकादमाने महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

हेही वाचा :

रोज साबण वापरणं आरोग्यास योग्य की घातक? जाणून घ्या

‘प्रियांका माझ्या हृदयात.. जेव्हा शाहरुख खाननं अफेयरच्या चर्चांवर सोडलं मौन

OYO रुमचं दार उघडं, मेट्रो स्थानकावरुन दिसला लाईव्ह रोमान्स Viral Video