शाहरुख खान धमकी देणाऱ्या आरोपीला धत्तीसगडमधून अटक,

अभिनेता सलमान खानला गेल्या अनेक दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा(Bollywood) किंग खान शाहरुख खानला देखील जीवे मारण्याची धमकी आणि 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी संशयित आरोपीला जयपूरमधून ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान, शाहरुख खान धमकी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. फैजान खानला मुंबई पोलिसांनी आज सकाळी शाहरुख खान धमकी प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी आरोपीला ट्रांसिट डिमांड घेण्यासाठी मुंबई पोलीस हे सकाळी रायपूरमध्ये दाखल झाले होते. आज सकाळी 11 वाजता जिल्हा न्यायालयात त्याला ट्रांजिट रिमांडसाठी देण्यात येणार आहे.

5 नोव्हेंबर रोजी मुंबईतील बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला होता. ज्यामध्ये बॉलिवूड (Bollywood)अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यासोबतच 50 लाख रुपयांची खंडणी देखील मागण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी लगेच आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी छत्तीसगडमधील रायपूर येथील असल्याचं समजलं.

त्यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये आरोपीने त्याचा फोन 2 नोव्हेंबर रोजी हरवल्याचं म्हटलं आहे. तसेच आरोपीने याबद्दलची तक्रार देखील जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. ज्यामध्ये तो म्हणाला की, त्याच्या फोनवरून त्याने कोणाला धमकी दिली हे त्याला माहिती नाही. परंतु, मुंबई पोलीस यांनी कलम 308 (4) आणि कलम 341 (4) नुसार या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. असं देखील म्हटलं जात आहे की, फैजान खान हा एक वकील आहे.

शाहरुख खानने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अशातच त्याचे चाहते त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खानसोबत दिसणार आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरु आहे. 2023 मध्ये शाहरुख खानच्या तिसऱ्या ‘डंकी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती.

हेही वाचा :

पदभार स्वीकारताच CJI संजीव खन्ना अ‍ॅक्शन मोडमध्ये! सुप्रीम कोर्टात आता ‘या’ गोष्टीवर बंदी

दिवाळीनंतर पुन्हा एकदा लाँग विकेंड; सुट्टीचा लुटा आनंद

‘शिस्त पाळा अन्यथा…’, एकनाथ शिंदेंचा नवनीत राणा आणि रवी राणा यांना जाहीर इशारा