अभिनेता अमिताभ बच्चन(actor) यांनी मुंबईतील अंधेरी भागात असलेला त्यांचा आलिशान डुप्लेक्स फ्लॅट तब्बल ८३ कोटी रुपयांना विकला आहे. त्यांनी हा फ्लॅट अटलांटिस नावाच्या इमारतीत खरेदी केला होता.
मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, अमिताभ बच्चन यांचा हा फ्लॅट २७ व्या आणि २८ व्या अशा दोन मजल्यावर असून त्याचा आकार तब्बल ५,१८५ चौरस फूट इतका आहे. १७ जानेवारी रोजी या फ्लॅटची विक्री झाल्याची नोंद झाली आहे.
अमिताभ बच्चन (actor)यांना या फ्लॅटमध्ये एकूण सहा कार पार्किंगसाठी जागा देण्यात आली होती. या विक्री व्यवहारासाठी ४ कोटी ९८ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते.
अमिताभ बच्चन यांनी हा फ्लॅट विजय सिंह ठाकोर आणि कमल विजय ठाकोर यांना विकल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते. या व्यवहाराची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अमिताभ बच्चन किंवा ठाकोर कुटुंबीयांकडून याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अमिताभ बच्चन यांनी हा ड्युप्लेक्स फ्लॅट एप्रिल २०२१ मध्ये ३१ कोटी रुपयांना खरेदी केला होता. आता चार वर्षानंतर त्यांनी ८३ कोटी रुपयांना फ्लॅट विकला आहे. या विक्रीच्या व्यवहारात अमिताभ बच्चन यांना तब्बल १६८ टक्के वाढ मिळाली आहे.
हेही वाचा :
काळाचा घाला! भरधाव बसची ज्येष्ठ दाम्पत्याला धडक
‘हे’ कच्च फळ खाण्याचे आहेत खूप आश्चर्यकारक फायदे; BP राहतो नियंत्रणात
‘सैराट’पेक्षाही भयंकर प्रकार! लग्नाच्या 5 वर्षानंतर जावयाला गाठलं; 8 ते 10 जणांनी कोयते काढले अन्…