अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैद

25 वर्षांच्या अभिनेत्री(Actress) आणि मॉडेलचं वांद्रेत रस्ता अपघातात निधनं झालं.पोलिसांनुसार, या मॉडेलच नाव शिवानी सिंग आहे. ती तिच्या मित्राच्या मोटरसाइकलच्या मागच्या सीटवर बसून जात होती. वांद्रे पश्चिमच्या आंबेडकर रोडच्या कलंजी स्क्वेअरवरून जात असताना त्यांची बाइकला डंपर चालकानं टक्कर मारली. या घटनेत डंपरच्या पहिल्या टायरच्या खाली शिवानी आई. तर तिचा मित्र थोड दूर जाऊन पडला. दोघांनाही जखमी अवस्थेत भाभा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे शिवानीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

शिवानी मालाडमध्ये राहायची आणि ती अभिनय क्षेत्रात सक्रिय होती. तिच्या मित्राचा पाय फ्रॅक्चक झाला आहे. एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की शिवानीच्या मित्रानं हेलमेट घातलं होतं. तर त्यांचा अपघात हा नशेमुळे वगैरे झाला नव्हता. याचा अर्थ शिवानीच्या(Actress) मित्र हा नशेत नसून शुद्धीवर होता. त्याच्यात नशा केल्याची कोणतीही लक्षणं दिसून आली नाही. तर डंपर चालक हा अपघातानंतर तिथून पळून गेला असून सीसीटिव्हीच्या फुटेजच्या मदतीनं त्याचा शोध सध्या सुरु आहे.

डंपर जप्त करण्यात आला आहे. ड्रायव्हरची ओळख होऊ शकली नाही, तरी पोलिसांनी अनोळखी व्यक्ती म्हणत त्याच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. तर पोलिस आता त्या डंपर किंवा टॅंकरच्या रजिस्ट्रेशनच्या मदतीनं आरोपी ड्रायव्हरचा शोध घेत आहेत. यासोबतच आरोपीला लवकरच पकडून शिक्षा होईल असे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे.

मुंबईमध्ये हिट अ‍ॅन्ड रन केस
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हिट अ‍ॅन्ड रनच्या केस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर यामुळे सतत ट्रॅफिक आणि त्यासोबत वाहन चालकांच्या किंवा प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याशिवाय या सगळ्यावर कठोर नियम असावे असं सतत म्हटलं जात आहे. पोलिसांनी लोकांना आवाहन केले की रस्त्याच्या नियमांचे पालन करावे आणि अपघात झाल्यास त्वरित कळवावे.

महाराष्ट्रातील हिट

  1. मे महिन्यात पुण्यात पोर्शे कार अपघातात बाईकवरून जाणाऱ्या दोन इंजिनियरचे निधन झाले होते.
  2. जुलै महिन्यात मुंबईत बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत बाईकवरून जाणारा नवरा-बायकोमध्ये बायकोचे निधन झाले होते तर नवरा जखमी झाला होता.

हेही वाचा :

कधी मिळणार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये

राजकीय महाभूकंप महाविकास आघाडीतून ‘हा’ पक्ष बाहेर पडला

पोलिसांसाठी आनंदाची बातमी; आता वाढदिवसाला मिळणार…