भूस्खलनामुळे बद्रीनाथ येथील भीषण परिस्थितीत अडकलीये ‘ही’ अभिनेत्री

मुंबई – गेले काही दिवस कोकण, मुंबई, संपूर्ण महाराष्ट्रासह(badrinath) इतर अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत जोशीमठ – बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळल्याने मनोरंजन विश्वातील अभिनेत्री कविता कौशिक अडकली आहे. उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये गेल्या काही दिवसांपासून कविता कौशिक अडकलीये.

रिपोर्टनुसार, कविता, तिचा पती रोनित बिस्वास त्यांच्या पाळीव कुत्र्यासह तिथे बांधलेल्या आर्मी कॅम्पमध्ये राहत होते. कविता, बद्रीनाथ या तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी गेली होती आणि तिथून परतत असताना रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे अडकली. ५ जुलै रोजी पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती बद्रीनाथला(badrinath) गेली होती.

मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं की, ‘चार दिवस तिथे अडकल्यामुळे मला अस्वस्थ वाटत होते. मला काशीपूरमध्ये एका महत्वाच्या कार्यक्रमाला जायचं होतं. मी अशी आशा व्यक्त करते की, आम्ही इथून सुखरूप बाहेर पडू.’ तिथल्या सद्याच्या स्थितीबद्दल सांगताना कविता म्हणाली की, ‘महामार्गावर हजारहून अधिक गाड्या अडकल्या आहेत. रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस, लष्कर आणि अनेक संघटना सातत्याने काम करत आहेत. लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहेत. येथे भीषण परिस्थिती असूनही सर्व पर्यटक सुरक्षित आहेत आणि ते कोणत्याही अडचणीत सापडणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घेत आहेत.’

पुढे ती म्हणाली की, ‘रेस्टॉरंट आणि हॉटेलवाले शौचालयात जाण्याकरिता २०० रुपये घेतात. आर्मी ऑफिसर्सना जेव्हा ही गोष्ट माहित झाली तेव्हा त्यांनी हॉटेलवाल्यांना पर्यटकांची मदत करण्यास सांगितले. अजूनही येथे अनेक गाड्या थांबल्या असून किती जण नक्की अडकले आहेत याची कल्पना करू शकत नाही. ‘

दरम्यान, कविता कौशिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, कविताने ‘एफआयआर’ मालिकेत चंद्रमुखी चौटेलाची भूमिका साकारली होती. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्याव्यतिरिक्त तिने ‘वो तेरा छलावा’, ‘कुटुंब’ आणि ‘कहानी घर घर की’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर तिने ‘नच बलिये ३’ आणि ‘बिग बॉस १४’ या रिऍलिटी शोमध्ये भाग घेतला होता.

हेही वाचा :

… म्हणून अक्षय कुमारने चित्रपटात येण्यापूर्वी बदललं नाव

अमेरिका माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबार Video

मोठी बातमी! अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार नाहीत?