‘अभिनेत्री काजोलचं विमान कोसळलं’, आईला फोनवर मिळाली मुलीच्या निधनाची बातमी

प्रसिद्ध व्यक्तींच्या मृत्यूच्या बातम्या जगभरात व्हायरल होताना पाहायला मिळतात. सोशल मीडियावर(Entertainment news) कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या निधनाची बातमी व्हायरल होणं तर आता एक सामान्य बाब झाली आहे.

सोशल मीडियावर सध्या कोणत्याही बातम्या मोठ्या (Entertainment news)प्रमाणात व्हायरल होतात. बातमी खरी असो किंवा खोटी इंटरनेटमुळे ती सहज व्हायरल होते. अनेक वेळा बॉलिवूड सेलिब्रिटींच्याही मृत्यूच्य अफवा उडतात. अखेर सेलिब्रिटींना स्वत: ऑनलाईन येत आपण जिवंत असल्याची ग्वाही द्यावी लागते. अशीच काहीशी घटना अभिनेत्री काजोलसोबत घडली होती.

अभिनेत्री काजोल 90 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही ती मोठ्या पडद्यावर झळकत आहे. काजोलने तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं आहे. अनेकांना माहित नसेल, पण काजोलच्या मृत्यूचीही अफवा उडाली होती. काजोलच्या आईला एक निनावी फोन आला होता, ज्याने त्यांना काजोलच्या निधनाची बातमी दिली होती. काजोल अलिकडेच प्रदर्शित झालेल्या दो पत्ती या चित्रपटात झळकली आहे.

दो पत्ती चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान काजोलने एक किस्सा शेअर केला, जेव्हा तिच्या आईला तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. काजोल कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये प्रमोशनसाठी पोहोचली होती. यावेळी तिने तिच्याबद्दलच्या व्हायरल झालेल्या विचित्र अफवांबद्दल सांगितलं. काजोलने सांगितलं की, “मी अनेक वेळा माझ्या मृत्यूची बातमी ऐकली आहे”.

काजोल यावेळी म्हणाली की, “सोशल मीडियाच्या आधीही असं व्हायचं. कुणीतरी माझ्या आईला फोन करुन सांगितलं होतं की, माझ्या विमानाचा अपघात झाला आणि विमान कोसळलं. त्या काळात सोशल मीडिया आणि मोबाईल फोन नव्हते, त्यामुळे नेमकं काय घडलं, याची शाहनिशा करण्यासाठी माझ्या आईला वाट पाहावी लागली आणि असं अनेक वेळा झालं”.

हेही वाचा :

मनोज जरांगे पाटलांकडून पत्ते ओपन ; या तीन जातींवर खेळणार मोठा डाव

फटाक्यांनी भरलेल्या दुकानात स्फोट; घटनेचा थरराक व्हिडिओ व्हायरल

आत्महत्येची भाषा करणारे आमदार कालपासून बेपत्ता, मुख्यमंत्र्यांचा तातडीने फोन