मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा एकदा ईडीच्या(ED) रडावर आला असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (दि.29) शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. जुहू येथील घरावर ही छापेमारी करण्यात आली असून पॉर्नोग्राफी प्रकरणी ही छापेमारी सुरू असल्यीची माहिती समोर येत आहे.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/11/image-422-1024x819.png)
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या(ED) टीमने पॉर्नोग्राफी प्रकरणी एकूण 15 ठिकाणी छापेमारी केली असून, अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्रा यांना जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. पॉर्नोग्राफी प्रकरणात कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी केला असून, दोन महिने तुरुंगावास भोगल्यानंतर राज कुंद्राला सप्टेंबर 2021 मध्ये सिटी कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर तुरूंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर राज कुंद्राने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.
दरम्यान, ईडीकडून आज करण्यात येत असलेल्या छापेमारी ही राज कुंद्रा याच्या जुहू येथील घर, कार्यालय आणि अन्य ठिकाणांवर करण्यात येत आहे. याशिवाय जवळच्या नातेवाईकांच्या घरांवरही छापेमारी झाल्याची बातमी आहे.
चित्रपट आणि ओटीटीवर काम मिळवून देण्याच्या नावाखाली काही लोक तरूणींना अश्लील चित्रपटात काम करण्याची जबरदस्ती करत आहेत, असे या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. मुंबईतील अनेक व्यावसायिक अश्लील चित्रपटांचे शूटिंग करून मोठी कमाई करत आहेत असा दावाही या तक्रारीत करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी मालाड वेस्टमधील एका बंगल्यावर छापा मारला. तो बंगला भाड्याने घेऊन तेथए पॉर्न फिल्मचे शूटिंग करण्यात येत होतं. पोलिसांनी छापा टाकून बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीसह 11 जणांना अटक केली होती.
हेही वाचा :
काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीचा पराभव; ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप
आता भाकरी कशी फिरवणार? महाराष्ट्राला सतावणारा प्रश्न
हाडं गोठवणारी थंडी वीकेंड गाजवणार; राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये तापमान 10 अंशांहून कमी?