धार्मिकतेच्या नावाखाली अभिनेत्रीने गिळले प्राणघातक बेडकाचे विष, तडफडून झाला मृत्यू

जगातील सर्वात विषारी बेडूक म्हणजे अमेझोनियन जायंट मंकी फ्रॉग. या सर्वात विषारी बेडकाचे विष बेकायदेशीरपणे वापरले जाते. हा बेडूक दिसल्यावर लोक यापासून लांब पळतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या बेडकाचे विष मेक्सिकोमध्ये आध्यात्मिक हेतूकरीत वापरले जात होते. अध्यात्म असावे पण अंधश्रद्धा नसावी. अध्यात्म असणे महत्त्वाचे आहे पण जेव्हा त्यात तर्कशुद्ध विचार नसतो तेव्हा त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळे एका अभिनेत्रीचा मृत्यू झाला.1 डिसेंबर रोजी रिट्रीटमध्ये धार्मिक विधी करत असताना, (Entertainment news)अभिनेत्रीने अमेझोनियन जायंट माकड फ्रॉगचे विष गिळले, त्यानंतर तिचा वेदनादायक मृत्यू झाला.

विधी दरम्यान विष गिळले
मेक्सिकन (Entertainment news)अभिनेत्री मार्सेला अल्काझार रॉड्रिग्जच्या कदाचित आपण काय करत आहोत हे लक्षात आले नाही. मार्सेलाने एका अध्यात्मिक विधीमध्ये भाग घेतल्यानंतर, तिने अमेझोनियन जायंट मंकी फ्रॉगचे विष प्राशन केले, त्यानंतर तिची तब्येत बिघडू लागली. मार्सेलाला उलट्या आणि जुलाब होऊ लागले, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्सेला हीलर ट्रेनिंग डिप्लोमा प्रोग्रामचा एक भाग म्हणून मेक्सिकोमध्ये अध्यात्मिक रिट्रीटमध्ये सहभागी झाली होती. त्याच्या विधी वेळी तिने कॉम्बो नावाचे पेय घेतले होते. या पेयांमध्ये वरती नमूद केलेल्या विषारी बेडकाचे विष होते.

अभिनेत्रीने नाकारले उपचार
द मेट्रोच्या म्हणण्यानुसार, मार्सेलाला उलट्या होऊ लागल्या आणि तीव्र ऍसिडिटी झाली. हे विधी दरम्यान शरीराच्या प्रतिक्रियांचा भाग आहे. तिकडे असलेल्या
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सुरुवातीला जेव्हा तिला आजारी वाटल्यासारखं झालं तेव्हा मार्सेलाने कोणतीही मदत घेण्यास नकार दिला. पण शेवटी तिचा मित्र तिला भेटायला आला तेव्हा मार्सेलाने उपचारासाठी होकार दिला. मार्सेलाला रुग्णालयात नेण्यात आले, पण तिला वाचवता यश आले नाही आणि मार्सेलाचा मृत्यू झाला. विष गिळल्यानंतर अभिनेत्रीला किती तासांनी रुग्णालयात नेण्यात आले हे कळू शकले नाही. आता तिचे चाहते सोशल मीडियावर अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहात आहेत.

हेही वाचा :

“विनोद कांबळीने सचिनला ओळखले नाही? पुनर्वसनाचा कटू प्रवास उघड”

सलमान खान आणि ऐश्वर्यावर पहिल्यांदा बोलला विवेक ओबेरॉय, अभिषेकला म्हणाला…

“दुसऱ्याच दिवशी मोठा निर्णय: राणे समर्थक आमदाराच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, आज राजभवनात शपथविधी”