आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

कोल्हापूरः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी कोल्हापुरात(industry) जाहीर सभा झाल्यानंतर रविवारी आदित्य ठाकरे यांची सभा होत आहे. त्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून शिंदे गटासह भाजपवर गंभीर आरोप केले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या गद्दार आमच्यावर वेगवेगळे आरोप(industry) करत आहेत. जे पळून गेले ते कशामुळे गेले हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे डरपोकांनी वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये.

संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना बाजूला ठेवून सरकार स्थापन करणार होते, या आरोपावरही आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं. ते म्हणाले, संजय राऊत हे जेलमध्ये गेले आणि निष्ठावान राहिले. माघारी परतल्यानंतरही त्यांची निष्ठा ढळलेली नाही. त्यामुळे विनाकारण आरोप करण्यात काहीही अर्थ नाही.

आदित्य पुढे म्हणाले, खोके सरकारने त्यांच्या काळात राज्यामध्ये एकही नवा उद्योग आणलेला नाहीत. उलट राज्यात येऊ घातलेले उद्योग गुजरातला गेले. त्यामुळे गद्दारांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना चपराक दिली.

हेही वाचा :

टाटा आणि अंबानी यांना मागे टाकत सर्वात पुढे SBI

आरक्षण न मिळाल्यास विधानसभेच्या आखाड्यात उतरणार : मनोज जरांगे

विशाल पाटील एकटे पडले? विश्वजीत कदम अन् चंद्रहार पाटील एकत्र, सांगलीत काय सुरू?