आदित्य ठाकरेंचा इशारा अन् दादरच्या हनुमान मंदिराला मिळालेल्या नोटीसीला स्थगिती

मुंबई: दादर रेल्वेस्थानकानजीक असलेल्या 80 वर्षे जुने हनुमान मंदिराला पाडण्यासंबंधीची नोटीस काल रेल्वे प्रशासनाकडून जारी करण्यात आली होती. त्यावर ठाकरे गटाचे आमदार(political) आदित्य ठाकरे चांंगलेच आक्रमक झाले होते. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे हनुमान मंदिराला भेट देणार असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध होऊ लागल्या. हनुमान मंदिरावरून राजकारण तापू लागताच, राज्यातील फडणवीस सरकारने(political)मंदिर पाडण्याच्या नोटीसीला स्थिगिती दिली आहे. इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरे तिथे जाण्यापूर्वीच भाजप नेते मंगलप्रभात लोढा त्याठिकाणी पोहचले आणि मंदिरात आरतीही केली. तसेच, मंदिर पाडल जाणार नाही. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

4 डिसेंबर रोजी रेल्वेने मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांना ‘अतिक्रमण’ म्हणून नोटीस बजावली. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर रेल्वेच्या जमिनीवर परवानगी न घेता बांधण्यात आले आहे. या रचनेमुळे प्रवासी आणि वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून दादर स्थानकावरील पायाभूत सुविधांच्या कामातही अडथळा निर्माण होत असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. मंदिर हटवण्यासाठी रेल्वेने सात दिवसांची मुदत दिली होती, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.

रेल्वे प्रशासनाच्या नोटीसीनंतर उद्धव ठाकरेंनी थेट पत्रकार परिषद घेत भाजपला धारेवर धरले. भाजपच्या एक तो सुरक्षित है या घोषणेचा समाचार घेत मुंबईत ’80 वर्षे जुने मंदिर पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कसले हिंदुत्व आहे?’ असा सवाल उपस्थित केला. त्यांचे खरे राजकारण तोडफोडीचे आहे आणि ते आपली सत्ता वाढवण्यासाठी हिंदूंचा वापर करत असल्याचा आरोपही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

तर आदित्य ठाकरे यांनीदेखील एक्सवर लिहिले, ‘भाजप केवळ निवडणुकीसाठी हिंदूंचा वापर करते असे दिसते.भाजप सरकारच्या @RailMinIndia (रेल्वे मंत्रालय) ने मुंबईतील 80 वर्षे जुने हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस दिली आहे. बांगलादेशात ना हिंदू सुरक्षित आहेत ना महाराष्ट्रात मंदिरे, कारण भाजप सरकारकडून आता मंदिरे पाडण्याच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे आमचे सर्व पदाधिकारी हे केंद्राशी संपर्कात होते. मी आमच्या पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी आलो. आम्ही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी याबाबत चर्चाही केली. काल आमचे एक शिष्टमंडळ रेल्वे अधिकाऱ्यांशी रेल्वे अधिकाऱ्यांना भेटले होते. मंदिर हटवण्याबाबत काढण्यात आलेल्य नोटीसीला स्थगिती देण्यात आली आहे.

स्थगिती मिळाल्यानंतर कोणी कशाला आरती केली पाहिजे. धार्मिक विषयात राजकीय वळण आणू नये. असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेवरही निसामा साधला. तसेच मंदिराला काहीही होणार नाही, मंदिर आहे त्याच ठिकाणी राहणार आहे. जे मंदिर जुने आहे, त्याला कोणीही पाडणार नाही. असही लोढा यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महायुतीत वादाची ठिणगी…

उद्या रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, जाणून घ्या सर्व माहिती

मैदानात घुसले हार्दिक पांड्याचे 3 चाहते, मिठी मारली अन्…