आणखी एका शिवसेना जिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला

पालघर: पालघर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर जीवघेण्या हल्ल्याचे(attack) प्रकार वाढले आहेत. पालघरचे बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या त्यांच्या सख्ख्या भावानेच केल्याची धक्कादायक घटना अद्याप ताजी आहे. मुंबईवरून परत येत असताना धोडी यांच्या लहान भावाने त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. अशोक धोडी 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. हे प्रकरण ताजे असतानाच जव्हार तालुक्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय घोलप यांच्यावर देखील जीवघेणा हल्ला झाल्याचे समोर आले आहे.

जुगाराच्या अड्ड्याचा प्रतिकार करणाऱ्यांवर जुगारी व त्यांच्या सहकार्‍यांनी हल्ला(attack) केला, ज्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकरणाची गंभीरता पाहून पोलिसांनी ३० जानेवारी रोजी सात आरोपींना अटक केली. या आरोपींमध्ये निर्मला फर्नांडिस, फ्रान्सिस फर्नांडिस, मायकल फर्नांडिस, नीलम फर्नांडिस, ज्योती फर्नांडिस, कलीम काझी आणि त्याची पत्नी यांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे.

हेही वाचा :

सांगलीमध्ये  दोरी समजून उचलायला गेला अन् निघाला साप, थोडक्यात तरुण बचावला

क्षणात होत्याचं नव्हतं झालं, 200 फूट दरीत कोसळली खासगी बस, 5 भाविकांचा मृत्यू

BSNL सिमकार्डधारकांसाठी खुशखबर! सिम कार्डवर टीव्ही पहा मोफत