गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर(Video)चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी जेव्हा मुंबईत मतदान झालं, तेव्हा ती पती रणवीर सिंहसोबत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आली होती. तेव्हा दीपिकाचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये दिसणाऱ्या बेबी बंपवरून काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
दीपिकाचा बेबी बंप फेक(Video) असल्याची टीका नेटकऱ्यांनी दिली. या टीकेनंतर पत्रकार फाये डिसूझा यांनी ट्रोलर्सना उत्तर देणारी एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शविला होता. ट्रोलिंगनंतर आता दीपिका पहिल्यांदाच मुंबईतील एका स्टोअरमध्ये तिच्या ब्युटी ब्रँडच्या लाँचसाठी पोहोचली होती. त्याचसोबतच तिने काही फोटो आणि व्हिडीओसुद्धा पोस्ट केले आहेत.
इन्स्टाग्रामवर लाइव्ह येण्याआधी दीपिकाने काही फोटो स्टोरीमध्ये पोस्ट केले होते. पिवळ्या ड्रेसमध्ये तिचा बेबी बंपसुद्धा पहायला मिळत होता. आपल्या स्कीनकेअर ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी तिने व्हिडीओसुद्धा पोस्ट केले आहेत. यामध्येही दीपिकाचा बेबी बंप पहायला मिळाला. तिच्या या व्हिडीओवर सर्वसामान्यांसोबतच इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडूनही कमेंट्सचा वर्षाव होतोय. अभिनेत्री बिपाशा बासूने लिहिलं, ‘स्वत:ची काळजी घे आणि तुझ्यावर सदैव देवाचा आशीर्वाद राहो.’ दीपिकाच्या चेहऱ्यावर गरोदरपणातील तेज दिसून येत असल्याचंही काहींनी म्हटलं आहे.
फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने चाहत्यांना प्रेग्नंसीची ‘गुड न्यूज’ दिली. सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याचं तिने म्हटलं होतं. तेव्हापासून दीपिकाचा बेबी बंप पाहण्यासाठी नेटकरी आतूर झाले होते. सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होत असताना दीपिका आणि रणवीर सिंह हे आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते. यावेळी पहिल्यांदाच दीपिकाचा बेबी बंप पहायला मिळाला. मात्र त्यानंतरही काहींनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
काही दिवसांपूर्वी जेव्हा दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा तिचा बेबी बंप न दिसल्याने नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. मे महिना उजाडला तरी दीपिकाचं पोट अजून कसं दिसत नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. तर काहींनी सरोगसीची शक्यता वर्तवली होती.
हेही वाचा :
इचलकरंजीतील तरुण सेल्फी काढताना गेला वाहून….
अण्णा हजारे, गो. रा. खैरनार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार
‘मला हलक्यात घेऊ नका, सगळ्यांचे टांगे पलटी करेन.!’; जरांगे पाटलांचा इशारा नेमका कुणाला?