नाशिक : महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये(politics) एकतर्फी असे यश मिळाले आहे. मात्र महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये निकालानंतर जोरदार नाराजीनाट्य सुरु आहे. जागावाटप, मुख्यमंत्रिपद, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि पालकमंत्रिपद अशा सर्वच मुद्द्यांवरुन महायुतीमधील बडे नेते हे नाराज आहेत. अजित पवार गटातील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यामुळे ते नाराज आहेत. तर नाशिकमधील अजित पवार गटाचे आणखी एक नेते पालकमंत्री पद वेगळ्याच जिल्ह्याचे मिळाल्यामुळे नाराज आहेत. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या नाराजीचे वारे वाहत आहेत.
पालकमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये(politics) रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपद निवडीला स्थगिती देण्यात आली आहे. तर आता दुसरीकडे अजित पवार गटातील नेते व दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीचे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर एका महिन्याने पालकमंत्रिपद जाहीर करण्यात आले. यामध्ये नरहरि झिरवाळ यांना हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. मात्र यावरुन ते नाराज असून आता ते उपमुख्यमंत्री अजित पवारांना जाब विचारणार आहेत.
वसमतमध्ये आमदार नवघरे यांच्या वतीने हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार कार्यक्रमाला आमदार प्रताप पाटील चिखलीकर, तानाजी मुटकुळे यांच्यासह महायुतीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नरहरी झिरवळ यांनी मिश्किल विधान केले. “तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? याबद्दल मी मुंबईला गेल्यानंतर वरिष्ठांना जाब विचारणार”, असे विधान नरहरी झिरवळ यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
“मी आज जरा कार्यक्रमासाठी उशिरा आलो. मंत्री पहिल्यांदाच झालो. पालकमंत्री पहिल्यांदाच झालो. झालो तो झालो, आता इथे आल्यावर समजलं की हा अल्प आणि गरीब जिल्हा आहे. मी आता सोमवारी गेल्यावर विचारणार आहे की तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? असा सवाल नरहरी झिरवळ यांनी केला. पण यातूनही आम्ही सर्व महायुतीचे नेते मंडळी मिळून युवकांचे प्रश्न, ज्येष्ठांचे प्रश्न असतील किंवा विविध समाजाचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेन”, असे देखील नरहरी झिरवळ म्हणाले आहेत.
नरहरी झिरवळ यांनी पालकमंत्रिपदावरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “असं काही होणार नाही. मी त्यांना विचारेन. दर मंगळवारी आमची मिटिंग असते. असे विधान केलं असेल तर योग्य नाही. त्यांच्याशी चर्चा करून का समज गैरसमज असेल तर दूर करेने, असे अजित पवार म्हणाले. कुणाच्या काही समस्या असेल तर मंगळवारच्या बैठकीत मांडण्याचा अधिकार आहे. त्या तुमच्यासमोर माांडण्याऐवजी माझ्या समोर मांडा, असं सांगणार आहे”, असे अजित पवारांनी सांगितले.
हेही वाचा :
भव्य दिव्य “छावा” चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात…..!
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले; तिसऱ्या उपमुख्यमंत्रीपदासाठी…
माहेरी जाण्यास नकार दिल्याने पत्नीला आला राग; पाचव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन