चेन्नईच्या पराभवानंतर ऋतुराज गायकवाड या खेळाडूंवर भडकला

चेन्नई सुपर किंग्ज(police) संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेला शानदार सुरुवात केली होती. मात्र सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज(police) संघाने २० षटकअखेर १६५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने १८.१ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि शानदार विजय मिळवला. दरम्यान या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

या सामन्यातील पराभवानंतर बोलताना ऋतुराज गायकवाड म्हणाला की,’ खरं सांगायचं झालं तर, मला असं वाटतं की, ही खेळपट्टी संथ होती. त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला सामन्यात येऊच दिलं नाही. माझ्या मते आम्ही सुरुवातीला चांगली कामगिरी केली. मात्र त्यानंतर त्यांनी शानदार कमबॅक केलं. ही काळ्या मातीची खेळपट्टी होती त्यामुळे आम्हाला माहित होतं की, खेळपट्टी संथ असणार. मात्र ही खेळपट्टी त्याहून अधिक संथ होती.’

या सामन्यातील पराभवानंतर बोलताना ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ‘ आम्ही पावरप्लेच्या षटकात जास्त धावा खर्च केल्या. एक झेल सोडला आणि एक महागडं षटक देखील होतं. असं असतानाही आम्ही हा सामना १९ व्या षटकापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. १७०-१७५ धावांचं आव्हन आव्हानात्मक राहुल शकलं असतं. शेवटी दवाचं प्रमाण वाढलं होतं . तरीदेखील १५-१६ व्या षटकात मोईन अलीने चेंडू चांगला स्पिन केला.त्यामुळे मला मुळीच वाटत नाही की, सामना सुरु असताना खेळपट्टीत काही बदल झाला.’

हेही वाचा :

वंचित अन् ठाकरे गटामुळे शेट्टी, मानेंसमोर अडचणींचा डोंगर

शिंदेंच्या शिवसेनेवर कमळाबाईचा कंट्रोल; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

आखिर क्या मजबूरी है.. अभिनेत्रीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली Video