“महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर…”; जरांगे पाटलांची नवी मोठी घोषणा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला(hunger strike) बसण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनी स्वतः मीडियाशी संवाद साधताना माहिती दिली आहे. जरांगे यांनी पंढरपूर येथे नुकतेच पांडूरंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी आणि आरक्षणासाठी बळ मिळू दे, असं साकडं पांडूरंगला घातलं. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी जरांगे यांनी पुढील दिशा स्पष्ट केली.

महायुती सरकार स्थापन होताच आम्ही पुन्हा एकदा आमरण उपोषणाला(hunger strike) बसणार, असं जरांगे म्हणाले आहेत. अंतरवली सराटीमध्ये मराठा घरातील प्रत्येक नागरिक उपोषणात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही समाजासोबत बैठक घेणार असून त्यानंतर उपोषण मुंबईत करायचे की अंतरवलीमध्ये, ते ठरवले जाईल.पण शक्यतो मुंबईतच आंदोलन होईल, असं जरांगे पाटील म्हणाले.

यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास त्यांना शुभेच्छा देणार का, असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी केला. त्यावर जरांगे यांनी फडणवीस यांना अगोदर मुख्यमंत्रीपदी शपथ तर घेऊ द्या, तुम्हालाच इतकी का घाई झाली आहे?, असा खोचक प्रतिसवाल माध्यम प्रतिनिधींना केला.

तसेच, सरकार कुणाचंही असलं तरीही मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार असंही जरांगे म्हणाले. विधानसभा निवडणूक लढविण्याचा फॉर्म्युला जुळला नाही, नाहीतर सुफडा साफ केला असता, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रामध्ये मराठ्यांशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, यावेळी मराठा समाजाने ओबीसी आमदार सुद्धा निवडून आणले आहेत. विधानसभा निवडणूक लढविण्याचा फॉर्म्युला जुळला नाही, नाहीतर सुफडा साफ केला असता. आम्ही आरक्षणाची चळवळ थांबवणार नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा :

तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची इच्छा; एकनाथ शिंदे म्हणाले…

सिनेविश्वात खळबळ, प्रसिद्ध अभिनेत्रीचा ‘त्या’ अवस्थेत आढळला मृतदेह

‘त्यांना फक्त व्हर्जिन मुली….’; अभिनेत्रीच्या खुलाशाने एकच खळबळ