­सह-कलाकाराला KISS केल्यानंतर नीना गुप्तानं डेटॉलनं केल्या गुळण्या!

लोकप्रिय अभिनेत्री नीना गुप्ता यांनी चित्रपटसृष्टीत त्यांच्या अभिनयानं (dettol no touch)छाप सोडल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनयाची जादू केली आहे. ‘पंचायत’ या सीरिजमधील तिच्या भूमिकेची सगळ्यांनीच स्तुती केली आहे. नीना यांनी इथवर पोहोचलण्यासाठी खूप कष्ट केले आहेत. कारण एकवेळ अशी होती जेव्हा त्यांना काम मिळत नव्हतं. याविषयी त्यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितलं होतं. खरंतर नीना गुप्ता या नेहमीच स्पष्ट वक्तव्य करताना दिसतात. मग त्यात खासगी आयुष्य असो किंवा प्रोफेशनल त्या स्पष्ट वक्तव्य करतात.

नीना गुप्ता यांनी सांगितलं की पैशांसाठी त्यांनी चित्रपटांमध्ये(dettol no touch) अशा भूमिका देखील केल्या ज्या त्यांना करायच्या नव्हत्या. त्यासोबतच त्यांनी एक किस्सा शेअर केला होता. जेव्हा पहिल्यांदा त्यांनी ऑनस्क्रीन एका अभिनेत्याला किस केलं होतं. नीना गुप्ता या त्या काळातील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती. पण हे सगळं करणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की किसिंग सीन करण्याचा अनुभव खूप वाईट होता. त्यामुळे त्या इतक्या चिंतेत होत्या की त्या संपूर्ण रात्र झोपल्या नाहीत. इतकंच नाही तर त्यांनी डेटॉलनं गुळण्या केल्या होत्या.

नीना यांनी ‘दिल्लगी’ या मालिकेती दिलीप धवनसोबत काम केलं होतं. या शोमध्ये त्यांच्यात एक किसिंग सीन होता. ज्यानंतर नीना यांनी सांगितलं की या शोमध्ये त्यांना दिलीपला लिप-टू-लिप असं किस करायचं होतं. हे करणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. कारण ते यासाठी तयार नव्हते. नीना यांनी सांगितलं की ‘मी संपूर्ण रात्र झोपू शकले नव्हते. असं नाही की ते माझे मित्र होते, आम्ही एकत्र काम करणारे कलाकार होतो. फिजिकली आणि मेंटली मी यासाठी तयार नव्हते. मी खूप नर्व्हस होते, पण मग मी स्वत: ला समजावलं.’

इतकंच नाही तर नीना यांनी सांगितलं की या सीनमुळे त्या चिंतेत होत्या. त्यांना स्वत: ला विचित्र वाटत होतं. जेव्हा त्या शूटवरून परतल्या तेव्हा त्यांनी डेटॉलनं तोंड धुतलं. मात्र, त्यानंतर तो सीन सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आला होता. त्याविषयी बोलताना नीना यांनी सांगितलं की त्या काळात असे सीन नव्हते. कारण लोकं त्यांच्या कुटुंबासोबत मालिका पाहायचे. निर्मात्यांना वाटत होतं की त्यामुळे शोचं प्रमोशन होईल. पण हा दावा उल्टा पडला आणि त्यानंतर हा सीन काढून टाकण्यात आला.

हेही वाचा :

सर्वसामान्यांना दिलासा! टोमॅटोचे दर अर्ध्यावर, पण इतर भाज्या कडाडल्या

 HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ४ ऑगस्टला राहणार UPI सेवा बंद

रश्मिका मंदानासोबत विक्की कौशलचा रॅम्प वॉक, व्हिडीओ व्हायरल