नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या(political updates) काळात राज्यातील विरोधी महाविकास आघाडीकडून मतदार यादीतील नावे गायब झाल्याचा दावा करण्यात आला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपकडून मतदार यादीतील मतदारांची नावे वगळ्याचा आरोप केला होता. त्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. त्यानंतर आता येत्या काही दिवसांत दिल्ली विधानसभा निवडणुका होणार आहे.
दिल्लीतील आम आदमी पक्षानेही या निवडणुकांची(political updates) तयारी सुरू केली आहे. असे असतानाच आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपवर तेच आरोप केले आहेत, जे महाराष्ट्रात नाना पटोले यांनी केले होते.
आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी भाजपवर दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप केला. राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी दावा केला की, ‘भारतीय जनता पक्ष (भाजप) मजबूत उमेदवार किंवा मुद्दे सादर करण्यात अयशस्वी झाल्यानंतर आता अयोग्य मार्गाने” निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप आधीच निवडणुका हरले आहे. त्यात मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा किंवा योग्य उमेदवारही नाही. हेराफेरी करून निवडणूक जिंकणे हेच त्यांचे ध्येय आहे.
भाजपने एकट्या मतदारसंघातील 11,000 मतदारांची नावे हटवण्यासाठी अर्ज दाखल केले होते, परंतु मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर हे थांबवण्यात आले. आम्ही ते उघड केल्यामुळे निवडणूक आयोगाने ही नावे हटवण्यास नकार दिला. 15 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू झाली, ज्या अंतर्गत त्यांच्या विधानसभा मतदारसंघ नवी दिल्लीमध्ये आतापर्यंत 5,000 मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज आणि 7,500 मतदारांची नावे जोडण्यासाठी विनंत्या दाखल करण्यात आल्या आहेत. यामुळे मतदारसंघातील 12 टक्के मतांमध्ये बदल होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
20 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या संक्षिप्त पुनरिक्षणानंतर 29 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 106,873 आहे. ‘ऑपरेशन लोटस’ आता माझ्या मतदारसंघात पोहोचले आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.
“ते निवडणूक निकाल बदलण्यासाठी मतदार यादीत फेरफार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. तसेच, अशा हेराफेरीमुळे लोकशाही कमकुवत होते. “आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन करतो की अशा प्रकारच्या अनियमितता रोखण्यासाठी त्यांचे कठोर निरीक्षण चालू ठेवावे.” या आरोपांवर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा :
काय सांगता!, १५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार?
लाडकी बहिण योजना बंद होणार?; ‘या’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोट!
150 मतदारसंघांत गडबड, अजितदादा 20 मतांनी पराभूत; आ. जानकरांचा धक्कादायक दावा