सध्या देशात कांदा, टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होत असून आता बटाट्याच्या (potato)दरात देखील वाढ होत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत असला तरी ग्राहकांना फटका बसतोय. केंद्र सरकारने दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी भूतानवरून बटाट्याची आयात करण्याची तयारी केली आहे.
महागड्या भाज्यांमुळे ग्राहकांना(potato) फटका बसत आहे, मात्र येत्या काही दिवसात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. सरकार बटाट्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचार करत आहे. शेजारील भूतानसह इतर देशांतून लवकरच बटाट्याची आयात सुरु करण्याची शक्यता वर्तवली जातेय. देशात बटाट्याचे कमी उत्पादन झाल्याने भाव चढे राहू शकतात. अशा परिस्थितीत सरकार दर कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचार करत आहे.
सरकार सध्या व्यापाऱ्यांना कमी प्रमाणात बटाटे आयात करण्याची परवानगी देऊ शकते. भूतानमधून बटाटे खरेदी करण्यास सरकारने गेल्या वर्षी मान्यता दिली होती. त्या मान्यतेनुसार, व्यापारी भूतानमधून बटाटे खरेदी करून जून 2024 पर्यंत परवान्याशिवाय भारतात आणू शकत होते. पण आता परवानगीची गरज आहे. बटाटा उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी भारतात 60.14 दशलक्ष टन बटाट्याचे उत्पादन झाले होते. यंदा बटाट्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाच्या पहिल्या अंदाजानुसार, यावर्षी देशात बटाट्याचे उत्पादन सुमारे 58.99 दशलक्ष टन असू शकते.
खराब हवामानामुळे पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये बटाटा पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळं कांदा, टोमॅटोप्रमाणे बटाट्याचे भावही वाढू लागले आहेत. टोमॅटो, कांदा, आणि बटाट्याची महागाई 48.4 टक्क्यांवर पोहोचली आहे. बटाट्याचे दर असेच वाढत राहून ऑक्टोबरपासून बाजारात तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बाजारात बटाट्याचा तुटवडा भासतो, मात्र यावेळी त्याचा परिणाम आधीच दिसून येत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा :
रोहित शर्मा – हार्दिक पांड्या कॅप्टन्सी वादावर अखेर Jasprit Bumrahने मौन सोडले
सगळं घर महिला चालवतात, 1500 देऊन अपमान का, 10 हजार रुपये द्या : संजय राऊत
‘लाडकी बहीण’ अडचणीत; सरकारच्या तिजोरीवर येणार ४६००० कोटींचा बोजा