रश्मिका मंदानानंतर सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटात ‘सिंघम’मधील अभिनेत्रीची एन्ट्री

काजल अग्रवालने 2004 मध्ये ‘क्यों! हो गया ना…’ या चित्रपटातून(film) अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर ती साउथ चित्रपटांचाही एक भाग बनली. अजय देवगनच्या ‘सिंघम’या चित्रपटातून मोठ्या प्रमाणात ओळख मिळाल. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता ती सलमान खानसोबत देखील दिसणार आहे.

रिपोर्टनुसार, अजय देवगन आणि अक्षय कुमार सारख्या कलाकारांसोबत काम केल्यानंतर काजल अग्रवाल आता बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात(film) रश्मिका मंदाना देखील असणार आहे.

काजल अग्रवालला एक मोठा बॉलिवूड चित्रपट मिळाला आहे. ती आता सुपरस्टार सलमान खानसोबत दिसणार आहे. अभिनेत्रीने अजय देवगण आणि अक्षय कुमार सारख्या बॉलीवूडमधील काही मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. आता ती ‘सिकंदर’ या चित्रपटात सामील होण्याची शक्यता आहे. चित्रपट निर्माते ए.आर. मुरुगादास यांच्यासोबत खानचे पहिले सहकार्य म्हणून या चित्रपटात रश्मिका मंदाना काम करणार आहे.

रिपो्टनुसार, काजल अग्रवालने देखील या चित्रपटासाठी सहमती दर्शविली आह. तर फिल्मफेअरमधील एका अहवालात असे म्हटले आहे की, सूत्रांनी पुष्टी केली आहे की अभिनेत्री या चित्रपटासाठी अधिच तयार होती. मात्र, या चित्रपटात ती कोणती भूमिका साकारणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ईदच्या दिवशी सलमान खानने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली होती. दीड वर्षांहून अधिक काळ ब्रेक घेतल्यानंतर सलमान या चित्रपटाद्वारे थिएटरमध्ये परतणार आहे. निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी चाहत्यांना वचन दिले आहे की ते सलमानला त्यांच्या आवडत्या ‘बॅड बॉय’ अवतारात पाहतील. ‘गजनी’ आणि ‘हॉलिडे: अ सोल्जर नेव्हर ऑफ ड्यूटी’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा ए.आर. मुरुगदास याचे दिग्दर्शन करत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा:

सणा सुदीच्या मुहूर्तावर पुन्हा ग्राहकांना झटका

खुशखबर… दसरा-दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार

सर्वसामान्यांना कांदा रडवणार! दर कमी होणार की नाही?