मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर(mumbai) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत… कधी डान्स, तर कधी सिनेमांमुळे चर्चेत असणारी अमृता आता मात्र सोशल मीडियापोस्टमुळे चर्चेत आली आहे. अमृता हिने स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुंबई पोलिसांनी केलेली पोस्ट शेअर केली असून अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘उफ्फ ये अदा!’ असं लिहिलं आहे. अभिनेत्री इन्स्टाग्राम स्टोरी पाहिल्यानंतर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, अमृताने असं का केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमृता हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, मुंबई(mumbai) पोलिसांनी एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी पोलिसांनी ‘हीरामंडी’ वेब सीरिजमधील प्रसिद्ध झालेल्या डायलॉगची मदत घेतली आहे. ‘एक बार देख लिजिए, दिवाने बना दिजिए, चलान काटने के लिए तय्यार है हम, तोह हेल्मेट पेहेन लिजिए’ अशी पोस्ट मुंबई पोलिसांनी शेअर केली आहे.
मुंबई पोलिसांची पोस्ट पाहिल्यानंतर अमृताने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर अभिनेत्रीने कॅफ्शनमध्ये, ‘मुंबई पोलीस गॉट नो चिल्ल उफ्फ ये अदाये’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र पोलिसांची पोस्ट आणि अमृताच्या कॅप्शनची चर्चा रंगली आहे.
अमृता खानविलकर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. शिवाय अभिनेत्री स्वतःचे वर्कआऊटचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता अमृता लवकरच ‘पठ्ठे बापूराव’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय लिला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ वेब सीरिजची सर्वत्र चर्चा रंगली आहे. लाहोर येथे असलेल्या हीरामंडी यावर सीरिजची कथा आधारलेली आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, शर्मिन सेहगल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे…
हेही वाचा :
सांगली : काँग्रेसच्या ‘मटण-भाकरी’ने खवळली शिवसेना, घात केल्याचा आरोप
सांगलीत कृष्णाकाठी आली चिखल पळवणारी टोळी, टोळीचा लक्षवेधी गोंगाट
हार्दिक पंड्या टीम इंडियासोबत अमेरिकेला जाणार नाही; समोर आलं मोठं कारण
घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती नताशाच्या वाट्याला?