लोकप्रिय जपानी अभिनेत्री(actor) आणि सिंगर मिहो नाकायमा त्याच्या टोक्योत असलेल्या घरी मृतअवस्थेत सापडली आहे. मिहो ही 54 वर्षांची होती. नाकायमा ही शुक्रवारी एका कार्यक्रमात पोहोचायचं होतं पण ती कधी पोहोचू शकली नाही. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला तर ती तिच्या घराच्या बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळली. तिच्या जवळच्या व्यक्तीनं आपत्कालीन सेवांशी संपर्क साधला आणि पॅरामेडिक्सने घटनास्थळी तिच्या मृत्यूची पुष्टी केली.
तिच्या निधनाचं कारण नेमकं काय आहे याचा तपास सुरु आहे. नाकायमाला शुक्रवारी ओसाकामध्ये एक क्रिसमस पार्टीमध्ये परफॉर्म करायचं होतं. पण तिची तब्येत ठीक नसल्यानं कार्यक्रम रद्द करण्यात आला. मिहो नाकायमाच्या टीमनं याविषजी तिच्या अधिकृत वेबसाईटवर(actor) तिच्या निधनाची बातमी आणि अचानक झालेल्या या घटनेविषयी दु:ख व्यक्त केले.
त्यात लिहिलं की ‘आम्ही त्या सगळ्या लोकांना, ज्यांनी कायम तिचा सांभाळ केला आहे आणि त्या सगळ्या चाहत्यांना, ज्यांनी तिला कायम पाठिंबा दिला आहे. त्यांना ही दु:खद बातमी देताना आम्हाला वाईट वाटतंय पण ही घटना इतकी अचानक घडली की आम्हालाही आश्चर्य झालं आहे. आता तिच्या निधना मागचं खरं कारण काय आहे याचा शोध सुरु आहे.’
नाकायमाविषयी बोलायचं झालं तर 1980 आणि 90 च्या दशकात ती खूप लोकप्रिय होती. 1985 मध्ये नाटक ‘मॅडो ओसावागासे शिमासु’ मझून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यातून तिला खरी लोकप्रियता मिळाली होती. त्याचवर्षी तिनं तिचं पहिलं गाणं ‘सी’ देखील रिलीज केलं होतं. नाकायमानं ‘बी-बॉप हाय स्कूल’ काम केलं आणि जपानमध्ये स्वत: चा एल्हम रिलीज केलं. तिनं 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव लेटर’ मधील कामासाठी लोक आजही तिला ओळखले जाते.
त्यांच्या करियर दरम्यान, नाकायमा जापानच्या सगळ्यात मोठी कलाकार झाली. ज्यांना चित्रपट, टेलिव्हिजन आणि संगीतात तिची एक वेगळीच ओळख आहे. ‘लव लेटर’ मध्ये तिच्या अभिनयामुळे तिला ब्लू रिबन अवार्ड्स आणि होची फिल्म अवॉर्ड्स दोन्हीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिलाय. तर चित्रपटानं टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार जिंकला आहे. नाकायमाच्या कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर तिला मुलगा आहे.
हेही वाचा :
Shocking Video: बापरे! डान्स करताना अचानक स्टेजवर कोसळली
अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैद
शिंदेंना गृहखात्यावर पाणी सोडावं लागणार?, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण