कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय जोडण्या सुरू… 

विधानसभा(assembly) निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय जोडण्या सुरू झाल्या असून उमेदवारी कधी जाहीर होते, याकडे इच्छुकांच्या नजरा मुंबईकडे लागून राहिल्या आहेत. जिल्ह्यातील दहा मतदारसंघात यावेळी काटाजोड लढती होणार असून महायुती, महाविकास आघाडीतील जागा वाटपानंतर मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे..

जिल्ह्यातील राजकीय चित्र पाहता या निवडणुकीत(assembly) महाविकास आघाडी, महायुतीसमाेर सर्व जागा राखण्याचे आव्हान ठरणार आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगले या चार मतदारसंघात काँग्रेसने ताकद लावून उमेदवार निवडून आणले होते. कागल, चंदगड या दोन मतदारसंघात राष्ट्रवादीला आपले खाते खोलता आले होते.

शिरोळ, इचलकरंजीत अपक्षाने विजयाचा झेंडा फडकवला. या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला मात्र एकही जागा मिळावता आली नाही. सध्या कोल्हापूर दक्षिणवर भाजपने कैची केली असून इचलकरंजीवरही आपले लक्ष केंद्रित केली आहे. दोन्ही मतदारसंघात उमेदवारांची जम्बो बोट भरून राहिली आहे. भाजपने उमेदवार निश्चित केले नसले तरी तयारीला लागा, असे संकेत दिले आहेत.

करवीर मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुती अशी लढत होण्याची शक्यता आहे. चंदगड मतदारसंघात विद्यमान आमदार इच्छुक असल्याने महायुतीकडून कोणाला उमेदवारी(assembly) मिळते, यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे. इचलकरंजी मतदारसंघात भाजपकडून आमदार प्रकाश आवाडे यांनी गत निवडणूक ताराराणी आघाडीतून लढवली होती. मात्र त्यांनी आपला तारा आता खाली ठेवत पुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडूनही मातब्बर उमेदवार दिला जाणार आहे.

शिरोळ मतदार संघात महायुती, महाविकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडी विरोधी महायुती, जनसुराज्य शक्ती तर शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिंणचेकर अपक्ष लढण्याची शक्यता आहे. शाहुवाडी पन्हाळा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील (आबा), विद्यमान आमदार विनय कोरे यांच्यात लढतीचे चिन्हे दिसत आहेत.

कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून समरजितसिंह घाटगे यांनी शड्डू ठोकला आहे, तर याच ठिकाणी अॅड. वीरेंद्र मंडलिक यांनीही आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गटात प्रामुख्याने लढत होण्याची शक्यता आहे.

राधानगरी मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात प्रमुख लढत होईल, असे चित्र आहे. विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा तगडा उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कोल्हापूर उत्तर आमदार जयश्री जाधव (काँग्रेस), कोल्हापूर दक्षिण आमदार ऋतुराज पाटील (काँग्रेस), कागल आमदार हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी अजित पवार गट), इचलकरंजी आमदार प्रकाश आवाडे (अपक्ष, शाहुवाडी आमदार विनय कोरे (जनसुराज्य शक्ती), चंदगड आमदार राजेश पाटील ( राष्ट्रवादी), शिरोळ आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर (अपक्ष), हातकणंगले आमदार राजू आवळे-बाबा ( काँग्रेस), करवीर दिवंगत आमदार पी. एन. पाटील (काँग्रेस), राधानगरी आमदार प्रकाश आबिटकर (शिवसेना शिंदे गट) असे पक्षीय आमदारांचे बलाबल आहे.

हेही वाचा:

माजी उपपंतप्रधानांना अटक; 1.35 अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप, सरकारवर जोरदार टीका

Jio ला ग्राहकांनी दिला जबरदस्त धक्का; रिचार्ज प्लॅन वाढीमुळे ग्राहकसंख्येत झाली प्रचंड घट

आज अन् उद्या मुसळधार! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुफान बरसणार