ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच, अल्लू अर्जुनचा (ott platform)‘पुष्पा २’ येथेही आपली जादू दाखवू लागला आहे. हा चित्रपट जागतिक स्तरावर आपली छाप पाडत आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर, पुष्पाने आता ओटीटीवरही राज्य करायला सुरुवात केली आहे. हा चित्रपट पाश्चात्य प्रेक्षकांवर मोठा प्रभाव पाडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. तसेच आता या चित्रपटाचो क्रेझ ओटीटीवरही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने मोठा रेकॉर्ड मोडला आहे.
हा रेकॉर्ड OTT वर बनवला गेला होता
ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच ‘पुष्पा २’ ने पाश्चात्य प्रेक्षकांवर खोलवर प्रभाव पाडला. हा चित्रपट सात देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ‘पुष्पा २: द रुल रीलोडेड व्हर्जन’ ने दुसरे स्थान कायम ठेवले आहे, चार दिवसांत जागतिक इंग्रजी नसलेल्या श्रेणीमध्ये (ott platform)५.८ दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत. या चित्रपटाला चाहते ओटीटीवरही चांगला प्रतिसाद देत आहेत.
बॉक्स ऑफिसवर खूप कलेक्शन केले
अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली आहे. सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने भारतात एकूण १२३३.८ कोटी रुपये आणि जागतिक स्तरावर १७४१.७५ कोटी रुपये कमावले आहेत. ‘पुष्पा २’ ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. याने दक्षिणेसह अनेक भारतीय चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड देखील निर्माण केला आहे.
‘पुष्पा २’ ची स्टारकास्ट
अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या या (ott platform)चित्रपटात रश्मिका मंदान्ना अल्लू अर्जुनच्या प्रेयसीची भूमिका साकारत आहे तर फहाद फासिल नकारात्मक भूमिकेत जबरदस्त अभिनय करताना दिसत आहे. इतर कलाकारांमध्ये जगपती बाबू, राव रमेश, अनसूया भारद्वाज, सुनील आणि इतर कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
हेही वाचा :
RBI कडून लवकरच मिळणार खुशखबर?; सामान्यांना मिळणार मोठा दिलासा!
“अमिताभजी त्यांना …”; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर सोनू निगमचा खोचक टोला
Income Tax नंतर आता टोलबाबतही सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; गडकरींनी दिले संकेत