रतन टाटांच्या निधनानंतर काय स्थिती टाटा ग्रुप्सच्या शेअरची? काय म्हणतंय शेअर बाजार?

बुधवार, ९ ऑक्टोबर २०२४ रोजी, भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. या बातमीने संपूर्ण देशभरामध्ये शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर शेअर बाजारामध्ये अनेक तर्क वितर्क लावण्यात आले होते. रतन टाटा(tata groups) यांच्या जाण्याचा शेअर बाजारावर मोठा फटका बसणार असे अनेक अंदाज बहुतेक गुंतवणूकदारांकडून लावण्यात आले. ८६ वर्षांचा मोठा प्रवास रतन टाटांसारख्या दानवीरांसाठी तर लहानच आहे. आज प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीच्या मनामध्ये त्यांच्या जाण्याने हळहळ आहे.

दरम्यान, ही शोककळा नश्चितच गुंतवणूकदारांमध्येही आहे. परंतु, या घटनेचा कोणताही परिणाम शेअर बाजारावर(tata groups) दिसून आलेला नाही. आज शेअर बाजार हिरव्या रंगामध्ये दिसून आले आहे. निफ्टी 50 च्या दरामध्ये ०.०७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. आज निफ्टी 50 चा दर २४९९८.४५ वर बंद झाला आहे, तर सेन्सेक्समध्ये ०.१८ % ची वाढ नोंदवली गेली आहे.

सेन्सेक्सचा आजचा बंद दर ८१६११.४१ आहे. शेअर बाजारामध्ये वाढ दिसून आल्याने या दुःखद बातमीचा शेअर बाजारावर फारसा परिणाम जाणवला नाही आहे. दरम्यान, निधनागोदर गुंतवणूकदारांमध्ये अनेक अफवा पसरल्या होत्या कि रतन टाटा यांना काही झाले कि याचा शेअर बाजारावर मोठा परिणाम दिसून येईल, तर काही चर्चा अशा होत्या कि शेअर बाजारावर परिणाम होऊ नये म्हणून रतन टाटांच्या निधनाची बातमी शुक्रवारी संध्याकाळी देण्यात येईल. परंतु, या निव्वळ अफवा होत्या.

रतन टाटा यांच्या मालकीच्या कंपनीचे बहुतेक शेअर्स आज हिरव्या रंगामध्येच ट्रेड करत होते. टाटा ग्रुप्सच्या काही शेअर्समध्ये घसरण पाहिली गेली. टाटा मोटर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये १.१३% घसरण पाहिली गेली तर टाटा कॉन्ज्युमर प्रोडक्टसमध्ये ०.३३% ची घसरण पाहिली गेली. तर टाटा स्टील, टाटा केमिकल्स, टाटा कम्युनिकेशन, टाटा पावर कंपनी आणि आणखीन बरेच स्टॉक आज हिरव्या रंगामध्ये ट्रेड करता होते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या दुःखद प्रसंगी हळहळ व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

लॉजवर प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या; पोलिसांनी ठोठावला होता दरवाजा…

रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी आवडता डॉग ‘गोवा’ हजर, भावनिक व्हिडीओ व्हायरल

साखर कारखानदार पाताळात गेले तरी सोडणार नाही : राजू शेट्टींचा तीव्र इशारा

निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; राज्य सरकारला दिलासा