अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या खासगी आयुष्याशी संबंधित काही बातम्या (marriage)बऱ्याच काळापासून पसरत आहेत. गेल्या काही काळापासून दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. मात्र, या बातम्यांवर अद्याप त्यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. आज, 5 फेब्रुवारीला अभिषेक बच्चनचा वाढदिवस आहे. अशातच, दोघांच्या लग्नाबाबतचा एक किस्सा चर्चेत आला आहे. तो किस्सा नेमका काय होता, ते पाहुयात. ऐश्वर्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. फिल्मफेअरशी बोलताना लग्नाबद्दल ती म्हणाली होती, “आम्हाला खूप काही जुळवून घ्यावे लागते. दोन्ही बाजूंकडून सहमती आणि असहमती होत राहते. पण काहीही झाले तरी संवाद तुटला नाही पाहिजे. यावर माझा विश्वास आहे.”
पुढे अभिनेत्री म्हणाली, “अभिषेकने या गोष्टीचा नेहमीच आदर केला आहे. नात्यात संवाद खूप महत्त्वाचा असतो. या सर्वांची सुरुवात मैत्रीने होते का? मैत्री काय आहे? मी अशा लोकांपैकी नाही जे म्हणतात की ठीक आहे आजसाठी हे संपवू. हे उद्यापर्यंत पुढे नेले नाही पाहिजे. तुम्हाला दररोज (marriage)वेळ द्यावा लागेल. या सर्वांचा अर्थ आदर आहे. आपल्या जोडीदाराचा नेहमी आदर केला पाहिजे. तसेच त्याच्यासाठी भावनिक देखील असले पाहिजे.”
अभिषेक त्याची पत्नी ऐश्वर्याचा खूप आदर करतो. भलेही ते काही काळ एकत्र दिसले नसतील, पण दोघांमध्ये कधीही कोणतेही मतभेद नसल्याचं सांगितलं जातंय. अभिषेक माझा खूप आदर करतो, असंही अनेकदा ऐश्वर्याने देखील सांगितलं आहे.काही काळापूर्वी अमिताभ बच्चन घटस्फोटाच्या अफवांमुळे त्रस्त झाले होते आणि त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक मोठी पोस्ट लिहिली होती. बिग बी यांनी लिहिले होते, “वेगळे होण्यासाठी आणि आयुष्यात त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्यासाठी खूप धैर्य, विश्वास आणि प्रामाणिकपणा (marriage)आवश्यक आहे. मी माझ्या कुटुंबाबद्दल फार कमी बोलतो, कारण मला ते खासगी ठेवायला आवडते. अफवा फक्त अफवा असतात, त्या पुराव्याशिवाय रचलेल्या खोट्या गोष्टी असतात.”
हेही वाचा :
RBI कडून लवकरच मिळणार खुशखबर?; सामान्यांना मिळणार मोठा दिलासा!
“अमिताभजी त्यांना …”; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर सोनू निगमचा खोचक टोला
Income Tax नंतर आता टोलबाबतही सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; गडकरींनी दिले संकेत