प्रचारासाठी अजित दादांनी शक्कल लढवली! AI चा वापर करून लाडक्या बहिणींना साद

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी(political isuee) अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक बडे नेते आपला अर्ज दाखल करत आहेत. हा अर्ज भरताना हे उमेदवार मोठे शक्तिप्रदर्शन करत आहेत. दरम्यान, एकीकडे अर्ज भरण्यााची लगबग चालू असताना दुसरीकडे हे नेते प्रचारासाठी खास रणनीती आखत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवारही (political isuee)यात मागे नाहीत. त्यांनी लाडकी बहीण योजनेचा आधार घेत महाराष्ट्रातील महिला मतदार तसेच पुरुष मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास शक्कल लढवली आहे. अजित पवार यांच्याकडून प्रचारासाठी चक्क कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या समर्थकांशी संपर्क साधण्यासाठी नाविन्यपूर्ण मोहिमा राबवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा प्रयोग केला आहे.आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून त्यांच्याकडून प्रचार केला जात आहे.

नुकतेच अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक नवी राजकीय जाहिरात शेअर केली आहे. या जाहिरातीत एका महिलेला माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असल्याचे दाखवण्यात आले आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा वापर महिला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कसा करत आहेत, यावर या जाहिरातीचा भर आहे.

हा व्हिडीओ एकूण 53 सेकंदांचा आहे. यामध्ये पती-पत्नी एकमेकांशी फोनच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडीओतील महिला आपल्या पतीची वाट पाहात असते. मात्र रात्रीच्या अंधारात पाऊस चालू असल्यामुळे व्हिडीओतील पुरुषाला घरी पोहोचायला उशीर होतो. घरी मुलं वाट पाहात आहेत, असं या व्हिडीओतील महिला चिंतेने सांगताना दिसत आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे ही महिला आपल्या पतीला केक घेऊन यायला सांगते. पतीकडे पेसै नसतात. त्यानंतर चिंता नको. दादांनी लाडक्या बहिणींना पैसे दिले आहेत, असे ही महिला आपल्या पतीला सांगताना दिसते. त्यानंतर व्हिडीओतील पती-पत्नीच्या चेहऱ्यावर हसू फुटते.

हेही वाचा:

ग्राहकांना झटका! दिवाळीपूर्वीच सोनं गेलं 80 हजार पार?

बांधकाम व्यावसायिकाची भर रस्त्यात हत्या

मुलांना सांभाळणाऱ्या बाईसोबत अरमान मलिकने केलं चौथ लग्न?