आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील(politics) अजित पवारांच्या पक्षाने विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांचा पत्ता कट करत त्यांना तिकीट नाकारलं आहे. वरुड-मोर्शी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा भुयार यांनी निर्णय घेतला आहे.
वादग्रस्त विधान ठरलं कारणीभूत
पक्षाकडून तिकीट नाकारण्यामागे भुयार यांनी केलेलं वादग्रस्त (politics)विधान प्रमुख कारण असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. भुयार यांनी एका सभेत मुलींच्या लग्नाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला. त्यांनी मुलींच्या सुंदरतेवर आधारित लग्नाच्या संधींबाबत केलेल्या विधानामुळे चौफेर टीका झाली होती. विरोधकांनीही या विधानावरून त्यांच्यावर निशाणा साधला होता.
भुयार यांचं स्पष्टीकरण
या प्रकरणानंतर भुयार यांनी हा व्हिडीओ जुना असल्याचं सांगत स्वतःचं स्पष्टीकरण दिलं. त्यांनी स्पष्ट केलं की, 2019 मध्ये मध्य प्रदेशमधील एका कार्यक्रमात ते विधान केलं होतं आणि त्याचा आजच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. मात्र, या विधानामुळे पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे.
अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरणार
तिकीट नाकारल्यामुळे भुयार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरूनही अजित पवार आणि घड्याळ चिन्हाचा उल्लेख गायब झाल्याचं दिसून आलं आहे. अजित पवारांचा पक्ष त्यांना अधिकृत चिन्हावर लढवण्यास उत्सुक नसल्याचीही माहिती समोर येत आहे.
राजकीय वर्तुळातील चर्चा
भुयार हे अजित पवारांचे विश्वासू आमदार मानले जात होते, त्यामुळे त्यांचा पत्ता कट होणं राजकीय वर्तुळात आश्चर्याचं कारण ठरलं आहे. तिकीट नाकारण्याचा निर्णय हा पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग असल्याचं बोललं जातं.
आता भुयार यांच्या अपक्ष उमेदवारीने वरुड-मोर्शी मतदारसंघातील निवडणुकीत रंगत वाढली आहे. त्यांची ही उमेदवारी महायुतीच्या मतांवर किती परिणाम करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
भाजपमधील नेते करत आहेत शिंदे गटात प्रवेश
कोणी काहीही बोलू लागल वातावरण तापत चालल….!
जुनी दोस्ती विसरून अभिजितनं झाडली दयावर गोळी, CID मालिकेचा नवा प्रोमो समोर