राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे (strength)पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर असून, त्यांनी विविध कार्यक्रमांतून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर युवा संवाद मेळाव्यात त्यांनी थेट गँग संस्कृतीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. बीड जिल्ह्यात सक्रिय असलेल्या राखेच्या आणि वाळूच्या गँगवर त्यांनी कठोर शब्दांत हल्ला चढवला.

गँग संस्कृती संपवणार, जातीय तेढ दूर करणार
युवा संवाद मेळाव्यात अजित पवारांनी बीडमधील विविध गँगवर ताशेरे ओढले. “इथे राखेची गँग आहे, वाळूची गँग आहे, पण या सगळ्या गँग सुतासारख्या सरळ केल्या जातील,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. बीड ही देव आणि देवतांची भूमी आहे, इथं गँग कल्चरने बदनामी होऊ नये, असं ते म्हणाले. याशिवाय, मराठा आणि वंजारी समाजांमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या वादांवरही त्यांनी भाष्य करत, “आपल्याला(strength) जाती-जातीतील दुरावा संपवायचा आहे,” असा ठाम निर्धार व्यक्त केला.
अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत सांगितले की, “स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवा. समाजात दहशत नको, विश्वास निर्माण करा. जातीपातीच्या नावावर फुटणे हा आपल्या समाजाचा अपमान आहे.” त्यांनी बीडकरांना एकजुटीने राहण्याचा सल्ला देत, समाजातील ऐक्य टिकवणं हीच खरी सेवा असल्याचे सांगितले.
बीडच्या विकासावर बोलताना अजित पवारांनी सांगितले की, शेतीत AI कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा. शेतकऱ्यांना नव्या युगाशी जोडण्यासाठी हा बदल आवश्यक आहे. बीडमध्ये तारांगण उभारण्यात येणार असून, जिल्ह्याच्या जवळच विमानतळ असणे गरजेचे असल्याचं(strength) त्यांनी सांगितलं. राज्यातील विमानतळांवर टप्प्याटप्याने नाईट लँडिंगची सुविधा सुरू होणार आहे.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात सुविधा वाढवण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. पुढे जाण्यासाठी राजकारणातही सर्वसमावेशकता हवी, हे पटवून देताना ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा सांभाळ करणारा माणूस अल्पसंख्याक होता, हे विसरू नका.” याच भाषणातून त्यांनी समाज एकत्र आणणारे, प्रगतीशील आणि विकासाभिमुख विचार मांडले.
हेही वाचा :
Ghibli फोटो तयार करणे पडू शकते महागात
पत्नीनेच पतीचं पितळ उघडं पाडलं; बलात्कार, ब्लॅकमेलिंगचे प्रकरण
Facebook Instagram वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसै वाढलं वापरकर्त्यांचं टेन्शन
धक्कादायक! भाजप महिला नेत्याचा बॉयफ्रेंडसोबत गार्डनमध्ये रोमान्स
कत्तलखान्यात चालल्या होत्या टेम्पो भरुन कोंबड्या अनंत अंबानींना कळताच video viral
५७ वर्षांचा अरबाज खान होणार बाबा? बेगम साहिबा देणार गुड न्यूज