85 व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांचा शरद पवारांना खास मेसेज! म्हणाले, ‘आपणांस उत्तम…’

मुंबई : आज (दि. 12) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे(politics) अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या 84 वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवारांनी 85 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त शरद पवार यांच्या पक्षाच्या ‘एक्स’ हँडलवर एक खास ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमधून शरद पवारांच्या जीवनातील खास प्रसंग दाखवण्यात आले आहे. तर त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवार यांनी 2023 साली शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत(politics) सरकार स्थापन केले. पक्षाचे दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले. 40 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली. यानंतर शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेलं.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगला. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र विधानसभेत अजित पवारांनी बाजी मारली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबात दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त ‘एक्स’वर शुभेच्छा दिल्या आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा, असे त्यांनी म्हटले आहे. तर आज अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही दिल्ली मध्ये आहेत. शरद पवारांच्या वाढदिवशी काका-पुतण्याची भेट होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्ली येथे रवाना झाले आहेत.

दरम्यान, आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार पक्षाच्या एक्स हँडलवर एक खास ट्विट करण्यात आले आहे. आज दिवसभर शरद पवारांच्या आयुष्यातील माहिती नसलेले क्षण ट्विट केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भीषण अपघात; पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

महालक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस, सर्व मनोकामना पूर्ण होणार!

80 हजार कमावतो, नो बॉस-नो मॅनेजर… बाइक ड्रायव्हरनं सांगितलेली गोष्ट ऐकताच बसेल धक्का