सांगलीत अजित पवारांचा भाजपला गुलीगत धोका…

सांगली: राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडी वेगाने राज्यात घडतंय दिसून येत आहेत. जवळपास सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांची(candidacy) पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र अनेक इच्छुक उमेदवार उमेदवारी न मिळाल्याने पक्ष बदलत आहेत.

दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी निवडणुकीआधी अनेकांनी पक्षांतर केले आहे आणि उमेदवारी(candidacy) प्राप्त केली आहे. दरम्यान महायुतीमधील भाजपला एक मोठा धक्का बसला आहे, कारण माजी खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजयकाका पाटील यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. रोहित पाटील यांच्याविरोधात संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचे २७८ जागांवर एकमत झाले असून, १० जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकेक पक्ष उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यात संजयकाका पाटील यांना तासगाव-कवठेमहांकाळमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी भाजपाच्या तिकिटावर सांगली येथून निवडणूक लढवली होती. परंतु, त्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांचा पराभव झाला होता. यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी संजयकाका पाटील यांनी भाजपाला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. संजयकाका पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश करताच तासगाव-कवठेमहांकाळमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

संजयकाका पाटील आणि रोहित पाटील यांच्यात लढत माजी खासदार संजयकाका पाटील हे तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे. याच मतदारसंघात शरद पवार गटाकडून दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात संजयकाका पाटील आणि रोहित पाटील यांच्यात लढत होणार आहे.

भाजपचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याबाबतची माहिती स्वत: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ट्विट करण्यात आले असून, त्यामध्ये माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची भक्कम साथ लाभेल, याची खात्री आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो.

हेही वाचा :

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

फायनान्स कंपनीतील महिलेला शरीर सुखाची मागणी; कामावरून काढून टाकण्याचीही दिली धमकी

‘शेवटी प्राजक्ता पृथ्वीकची झाली…’; ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेता गुपचूप अडकला लग्न बंधनात