शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी(news) समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष मोफत विज देण्याचं आश्वासन दिलं आहे. महायुती सरकार आणा पुढील 5 वर्षे मोफत वीज मिळेल, असं अजित पवार म्हणालेत.
राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज सोलापूरमधील मोहोळमध्ये आहे. यावेळी अजित पवारांनी(news) उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी भरसभेत शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे.
काही योजना या आउटडेटेड झाल्यात म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणली. पूर्वी शेतकऱ्यांना लाईट बीलसाठी अनुदान मिळायचे. मात्र आता यापुढे वीजबिल द्यायचं नाही आणि मागचं बील द्यायचं नाही. आमचं सरकार आणा, पुढील 5 वर्षे मोफत वीज मिळेल, असा शब्द अजित पवार यांनी यावेळी दिला.
50% फी भरायला नव्हते म्हणून एका मुलीने आत्महत्या केली. अरे मुली काय आत्महत्या करायला जन्माला येते की काय? म्हणून मी सचिवाला बोलवले आणि विचारले किती खर्च येईल. त्यानंतर आम्ही मुलींना मोफत शिक्षणाची योजना आणली, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
माजी मंत्री सुनील केदार म्हणाले आम्ही सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करू… ही योजना बंद करायला काय तुझ्या घरची योजना आहे का?, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा:
आंघोळ करणाऱ्या महिलांचे ‘तो’ बनवायचा व्हिडिओ; कोट्यवधींची जमवली प्रॉपर्टी अन्…
विधानसभेचे बिगुल लवकरच वाजणार! निवडणूक आयोगाचा तीन दिवसीय महाराष्ट्र दौरा
कोयता नाचवत १० घरांच्या काचा फोडल्या, तोडफोडीचा थरार CCTVत कैद