राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड(political circle) यांनी आपल्या सोशल मिडिया एक्स वरती एक व्हिडिओ शेअर केला आहे. अजित पवार दादागिरी करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करताना केला आहे. त्या व्हिडिओमुळे सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
हा व्हिडिओ श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील असल्याचा दावाही जितेंद्र आव्हाडांकडून(political circle) केला गेला आहे. इथ जरी कुणाचही युनिट असलं तरी पुढं चालवायचं की नाय चालवायचं याबाबत मी बरंच काही करू शकतो, असं अजित पवार म्हणाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही लोकांसोबत बैठक घेत आहेत, त्यावेळी ते कारखान्याचा उल्लेख करत आहेत.
मला तुमची साथ हवी आहे. कुणाच्या दबावाला घाबरायची गरज नाही. आधी रामराजे यांचं ऐकलं आता माझं ऐकावं अशी विनंती आहे. इथ जरी कुणाचही युनिट असलं तरी पुढं चालवायचं की नाय चालवायचं ह्याबाबत मी बरच काही करू शकतो…. बोला… दबाव आहे का तुमच्यावर?, असा सवाल अजित पवारांनी विचारल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.
*अजित पवारांची
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 10, 2024
दादागिरी नही चलेगी नही चलेगी
*(सदर व्हिडिओ श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील असल्याची सूत्रांची माहिती)*
मला तुमची साथ हवी आहे. कुणाच्या दबावाला घाबरायची गरज नाही. आधी रामराजे यांचं ऐकलं आता माझं ऐकावं अशी विनंती आहे. *इथ जरी कुणाचही युनिट असलं… pic.twitter.com/8oUK3MZQOv
मला बरंच काही करता आलं असतं. कुणी म्हणत होतं धारूने नाही अजित पवारने कारखाना घेतला. शेजारी असणारा शरयू कारखाना माझ्या बंधूने घेतला. त्यावेळीं ह्या कारखान्याबाबत माझ्याकडे सुद्धा ऑफर आली होती. त्यावेळी सगळं काही झालं होतं परंतु माझ्या माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच याच परिसरात युनिट असल्यामुळे मी काही केलं नाहीं. परंतु आता मी जर काही गंमत करायची ठरवली तर खूप काही करू शकतो. परत तुम्ही रडत माझ्याकडे याल, असंही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा :
सुनील गावस्करांनी रोहितवर केलेल्या टीकेवर पत्नी रितिकाने दिली जबरदस्त रिऍक्शन
महायुतीचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण?; अमित शहांनी अखेर सांगूनच टाकलं
500 रुपयांत सिलिंडर ते 100 यूनिट मोफत वीज, मविआच्या जाहीरनाम्यातील 10 मोठी आश्वासनं!